संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १७६ ते १८०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

छेदियेला वृक्ष तुटलें तें मूळ अभंग क्र.१७६

छेदियेला वृक्ष तुटलें तें मूळ । प्रपंच समूळ उडोनि गेला ॥
गेलें तें सुमन गेला फुलहेतु । अखंडित रतु गोपाळीं रया ॥
सांडिला आकारु धरिला विकारु । सर्व हरिहरु एकरूपें ॥
निवृत्ति निधान वोळले गयनी । अमृताची धणी आम्हां भक्ता ॥

अर्थ: ह्या अभंगात आलेले रुपक मागच्या अभंगतुन आले आहे. त्या संसार वृक्षाला मी तोडला व तो समुळ उखडला.त्यामुळे त्या प्रपंचाचा निरास झाला. त्या प्रपंच वृक्षाच्या संसार नावाच्या फुलातील विषय नावाचा भोग गेला तसेच हेत म्हणजे इच्छा ही राहिली नाही.त्यामुळे मी अखंडितपणे त्या गोपाळाबरोबर रत झालो. शिव व विष्णु हे एकरुप आहे हे जाणवल्यामुळे सर्व जगताच्या आकार व विकार ह्यांना मी सोडले. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथांनी सांगितलेल्या नाम निधानामुळे भक्तांना नामामृताची प्राप्ती झाली.

विस्तार हरिचा चराचर जालें अभंग क्र.१७८

विस्तार हरिचा चराचर जालें । त्या माजी सानुलें गुरु दैवत ॥
गुरुविण व्यर्थ विज्ञान न संपडे । ज्ञान हेतुकडे हिंडनें व्यर्थ ॥
गुरु परब्रह्म गुरु मात पिता । गुरूविण दैवत नाहीं दुजें ॥
निवृत्ति म्हणे मज गुरु बोध दिठी । भक्ति नाम पेटी उघडिली ॥

अर्थ: त्या हरिचा विस्तार संपुर्ण चराचरा व्यापुन उरलेला आहे त्यामुळे त्या व्यापक स्वरुपापुढे माझे गुरु जरी लहान वाटत असले तरी वापरेल्या दैवत उपाधीने ते ही व्यापकच ठरतात. (अणु रेणु या थोकडा तुका आकाशा येवढा ).संसार समजचे विज्ञान गुरुविण कळत नसले व शुध्द ज्ञान जरी झाले तरी त्याचा हेतु हरि झाला नाहीतर ते व्यर्थ ठरते. असे माझे गुरु माझे माता पिताच आहेत व हेच माझे दैवत आहे दुसरे नाही. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथांच्या बोधामुळे मला नामभक्तीची पेटी उघडता आली.

तुटलें पडळ भेटलें केवळ अभंग क्र.१७९

तुटलें पडळ भेटलें केवळ । सर्व हा गोपाळ गुरुमुखें ॥
न देखों बंधन सर्व जनार्दन । व्यासदिकीं खूण सांगितली ॥
ब्रह्मांडविवरण हरिचा हा खेळ । त्यांतील हा वेळ तोडियेला ॥
निवृत्ति बोधला गुरुखुणा बोध । मनाचा उद्बोध हरिचरणीं ॥

अर्थ: श्री गुरु गहिनीनाथांच्या मुखात ऐकलेल्या त्या परमात्म्याच्या ज्ञानाच्या बोधामुळे माझे भ्रांतीचे पडळ तुटले व मला आत्मस्वरुपातील भगवंताचे दर्शन झाले. श्री गुरु व्यासानी त्यांच्या ग्रंथात वर्णन केलेले वासुदेवाचे स्वरुप वाचुन आम्हाला त्याला जाणण्याचे कोणतेच बंधन उरले नाही.सर्व ब्रह्मांड ची निर्मिती करणे ही हरिची लिला आहे. व त्याला त्यासाठी वेळेचे बंधन उरले नाही.तो ते निमिशमात्रात करतो. निवृतिनाथ म्हणतात, त्याच्या खुणेचा बोध गुरु गहिनीनाानी केल्यामुळे माझे मन त्या हरिचरणावर विनटले आहे.

मारुनि कल्पना निवडिलें सार अभंग क्र.१८०

मारुनि कल्पना निवडिलें सार । टाकीलें असार फलकट ॥
धरिला वो हरि गोविलेंसे सर्व । विषयाची माव सांडीयेली ॥
पहाते दुभतें कासवी भरितें । नेत्रानें करितें तृप्त सदा ॥ 
निवृत्ति अमृत गुरुकृपातुषार । सर्व ही विचार हरि केला ॥

अर्थ: मी कल्पनेचा त्याग केला व आत्मस्वरुपाचे सार स्विकारल्यामुळे मला फलकट संसार टाकता आला. नाम मंत्र जीवी धरल्यामुळे त्या व्यापक परमात्म्याला नामभक्तीने मनात गोवले त्यामुळे इंद्रियांना विषय उरला नाही मग विषय मला टाकता आले. जशी कासवी नेत्रातुन पान्हा देऊन पिलांचे पोषण करते तसे माझे पोषण गुरु करतात. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथांनी केलेले नामामृत तुशारांच्या वर्षावा मुळे माझा विचारच हरिरुप झाला बुध्दीला हरि वाचुन काही दिसत नाही.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *