ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.414

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१४

सगुण देह बापा निर्गुण माझें शीर । हा तो भेदाकार कैशापरी ॥१॥ दैवी असुरी पूर्व पश्चिम मार्ग की रे । शून्यांतील सारें चराचर हे ॥२॥ ज्ञानदेव म्हणे भेद ऐक गुरुपुत्रा । नयनीं अर्धमात्रा सर्व जन ॥३॥

अर्थ:-

जसे एका देहाच्या ठिकाणी धड व शीर असे दोन भाग असतात. त्याप्रमाणे आत्म्याचे सगुणरुप हा देह व निर्गुणरुप शीर आहे. तसे पाहिले तर दोन्ही एकच आहेत. दैवी संपत्ती किंवा आसुरी संपत्तीचे पुरुष हे दोन्ही माया कार्यच आहेत. हे गुरुपुत्रा सर्व लोकांच्या डोळ्यामध्ये अर्धमात्रारुप एक ब्रह्मच आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *