ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.४३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

नवल देखिले कृष्णरूप बिंब । सांवळी स्वयंभ मूर्ति हरीची ॥ मन निवाले समाधान जालें । कृष्णरूपे

बोधले मन माझें ॥ बापरखुमादेविवरू सांवळा सर्व घटी । चित्त चैतन्या मिठी घालीत खेवो ॥

अर्थ:-

 त्या सावळ्या कृष्णाची स्वयंभु मूर्ती मी पाहिली व मला त्याचे नवल वाटले. त्या

कृष्णरुपाच्या बोधामुळे माझे समाधान झाले व मन शांत झाले. तो रखुमाईचा पती व माझे पिता सर्वांमध्ये चैतन्यरुपाने असुन त्याला मी मिठीत कवळुन घेत आहे. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *