शुभ कार्यांमध्ये नारळ का फोडतात ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

शुभ कार्यांमध्ये नारळ फोडण्याचे काय महत्त्व आहे, जाणून घ्या

घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरू करावयाचे असो. प्रत्येक वेळी कार्याच्या शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडलं जातं. नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगळदायी मानले गेले आहेत. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

नारळ गणपतीला अर्पण केलं जातं. नंतर त्याला प्रसाद म्हणून वाटप केलं जातं. हे एक पवित्र फळ आहे त्यामुळे देवाला अर्पण केलं जातं. कोणतेही कार्य करण्यासाठी नारळच का अर्पण केलं जातं? नारळाचं का फोडलं जातं? तर याचे कारण असे की ऋषी विश्वामित्र नारळाचे निर्माते मानले गेले आहे. ह्याचा वरील कडक भाग हे दर्शवते की कुठल्याही कार्याच्या यशाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणारच.

नारळ वरून कडक आणि आतून सौम्य कोमल असतं. ह्या मधील पाणी पवित्र मानले गेले आहे. नारळ गणपतीला अतिप्रिय आहे. त्यासाठी त्यांना काहीही नवे कार्याच्या शुभारंभाच्या आधी नारळ फोडून त्यामधील पवित्र पाणी सर्वत्र शिंपडले जातं. जेणे करून नकारात्मक शक्तीचा ह्रास होतो.

नारळ स्वतःच्या अहंकाराचे प्रतीक असतं. नारळ शरीराचे प्रतिकात्मक असतं. नारळ फोडणे म्हणजे आपण स्वतःला संपूर्ण विश्वात समरस केले आहे. यावर असलेले तीन डोळे भगवान शंकराचे डोळे मानले जाते. ज्यामुळे आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होते.

संस्कृत मध्ये नारळाला ‘श्रीफळ’ असे म्हटले जाते. श्री चा अर्थ लक्ष्मी असे. पौराणिक मान्यतेनुसार लक्ष्मीशिवाय कुठलेही शुभ कार्ये होत नाही आणि शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो. नारळाच्या झाडाला संस्कृत मध्ये ‘कल्पवृक्ष’ असे ही म्हटले जाते.कल्पवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करते. पूजेनंतर नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांना दिला जातो.

शुभ कार्यांमध्ये नारळ फोडण्याचे काय महत्त्व आहे या बद्दलची माहिती समाप्त .

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *