ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.११४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११४

अष्टांगयोगे न शिणिजे । यम नेम निरोध न कीजे रया ॥ वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे । गांता वंता श्रवणी ऐकीजे रया ॥

गीताछंदे अंग डोलिजे । लीला विनोदे संसार तरिजे रया ॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु नामें । जोडे हा उपावो कीजे रया ॥

अर्थ:-

 अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, स्नान, तितिक्षा ह्यामध्ये उगाच श्रमण्यात काही अर्थ नाही. ज्या पेक्षा त्या परमात्म्याचे गुण गायन करा व कोणी दुसरा करत असेल श्रवण करा. त्या गुणगीतांमुळे

अंग डोलायला लागते. व त्याच्या लिला श्रवणाने संसारातुन तरुन जाता येते. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांच्या नामस्मरणाचा उपाय हा तारक आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *