ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 114
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११४
अष्टांगयोगे न शिणिजे । यम नेम निरोध न कीजे रया ॥ वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे । गांता वंता श्रवणी ऐकीजे रया ॥ गीताछंदे अंग डोलिजे । लीला विनोदे संसार तरिजे रया ॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु नामें । जोडे हा उपावो कीजे रया ॥
अर्थ:-
अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, स्नान, तितिक्षा ह्यामध्ये उगाच श्रमण्यात काही अर्थ नाही. ज्या पेक्षा त्या परमात्म्याचे गुण गायन करा व कोणी दुसरा करत असेल श्रवण करा. त्या गुणगीतांमुळे अंग डोलायला लागते. व त्याच्या लिला श्रवणाने संसारातुन तरुन जाता येते. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांच्या नामस्मरणाचा उपाय हा तारक आहे असे माऊली सांगतात.
