ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.268

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २६८ 

सुख सोज्वळ मोतियाचे लेणें । दिधले जाई जणे बाईये वो ॥ देशी नाही देशाउरी नाही । हाटणी नाही ते पाटणी नाहीं ॥ लक्षाचेनि लाभें जोडलें निधान । बापरखुमादेविवरा विठ्ठलु जाण ॥

अर्थ:-

संसाराची दुःखे भोगीत असता कष्टी झालेली जी मी, त्या मला श्रीकृष्णाने मुक्तिरूप सोज्वळ अलंकार दिला अशाश्वत संसार कोठे आहे. म्हणून पाहू गेले तर तो बाजारात किंवा नगरांत नाही. तसेच रानावनांत नाही.

देशात नाही. तत् पद लक्ष्याचा लाभ म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचा लाभ हेच मला निधान म्हणजे मोठा ठेवा प्राप्त झाला आहे. तो ठेवा कोणता म्हणाल तर माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल हेच होय. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *