ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.263

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २६३ २६३

सुकुमार सुरस परिमळे अगाध । तयाचा सुखबोध सेवीं आधी ॥ मना मारी सुबुध्दी तल्लीन मकरंदी । विषय उपाधी टाकीं रया ॥ रखुमादेविवरु गुणाचा सुरवाडु । मनबुध्दि निवाडु राजहंसु ॥

अर्थ:-

सुकुमार,सुरस असा परिमळ अगाध आहे. तेंव्हा त्याचा सुखोपभोग आधी घेऊ. मनाला मारुन मिळालेला सुबुध्दीरुप मकरंदाचा स्वाद घेताना विषय व उपाधी टाकुन देऊ. रखुमाईचे पती श्री विठ्ठल हे गुणांची खाणी असुन ते मन व बुध्दी निवडुन घेणारे जणुकाही राजहंस आहेत असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇