ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.262

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २६२

सकुमार साकार परिमळें आगळें । कर्पुर परिमळें घोळीयेला ॥ मित्रपणें करा मधुर अळुमाळा । मधुकर गोपाळ हृदयी धरा ॥ भवतरु भवमूळीं भवमूळ छेदन । तेंचि अंगी चंदन लाविजेसु ॥ बापरखुमादेविवरु सुकुमारु आगळा । वेदश्रुती बाळा वेधलिया ॥

अर्थ:-

सुकुमार साकार कापुर जणुकाही कापराच्या सुगंधात घोळला आहे. अशा मधुकर गोपाळाशी मधुर बोलुन त्याच्याशी मित्रपण प्रस्थापित करा. भवतरु भवमुळ यांचे छेदन करणारा श्रीकृष्ण चंदनाप्रमाणे सर्वांगास लावावे. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी वेदश्रुतींना तरुण मुलींना भुरळ पाडावी तसे वेधले आहे असे माऊली सांगतात.

Leave a Reply