ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.264

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २६४

बोलतां बोलु मावळला । तो मावळोनी उरला । हा भावो केवीं गमलारे बापा ॥ की इंद्रियांचा भोगु खुंटला । की समंधियाचा ठावो निमाला । की वर्णावर्ण भला । विचारुं नाही ॥ तैसे आपुलेंचि करणें अपुलेंचि नवल । खेळिया होऊनि दावी रया ॥ तपे अनेक विधी । करावी हे मनाची आधी । करिता करणे सिद्धि । नव्हे यासी म्हणोनि वाऊगाचि वळसा । पडे या घिंवसा । तैसा कल्पनेचा फांसा । मायाबंधु ॥ ऐसीयाच्या पाठी । कां होसी हिंपुटी । नलगे तुज सुखाचा स्वादु या गोष्टी । येणे ऐसेंचि विचारी । एकुचि धीर धरी । नलगे या व्दैतासाठी रया ॥ म्हणोनी डोळियांचे देखणें । लाघव तो देखणा जाणे । तेथे आपपर पिसुणें । न देखे कांही ॥ ते शब्देंवीण बोलतां निःशब्दें ये हातां । ऐसा उपावो करी कांही ॥ जोडिलिया धना वाढी बहु असे । तेथे वेचलें न दिसे कांही ॥बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतितां । सुखाचेनि सुखें राही । निवृत्तीरायें खुणा दाऊनियां । सकळ पुनरपि येणे नाही ॥

अर्थ:-

वेदशास्त्रादि बोलू म्हणजे सर्वरितीने वर्णन करुन मावळला.आणि शब्द निमाल्यानंतर बाकी उरला तो परमात्मा हे तुला कसे कळले रे बाबा तुझ्या इंद्रियाचा भोग बंद झाला. किंवा आप्तेष्टांचा ठावठिकाणा संपला. वर्णावर्ण नाहिसा झाला. ह्यापुढे विचार चालत नाही.तसे आपुलेच करणे नवल वाटुन खेळातील खेळाडु होऊन दाखव. बराच काळ केले तप व विविध विधी करावेत हा मनाचा खेळ आहे तसे केल्यांने त्याची प्राप्ती होईलच हे सांगता येत नाही. व फुकटचा हा तपांचा वळसा पडुन मायाबंधात जखडला जाशिल. तु असल्या गोष्टींच्या पाठी का लागतोस व उदास का होतोस? या गोष्टी मुळे तुला सुखाचा स्वाद चाखता येणार नाही. त्यासाठी धिर धरुन तु द्वैत सोड. डोळ्यांच्या पाहण्याचे सुख ज्याला दृष्टी आहे त्याला कळते.पण तरी वेड्यासारखे आपपर पाहणे चांगले नाही. जसे शब्दाविण बोलायले गेले तर निशब्दपणाच मिळेल. असा काही उपाय कर की ज्याने ब्रह्मधन तुला सुख देईल.व ते धन खर्च ही होणार नाही. माझे बाप व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन केले तर सुखाचे सुख मिळेल व श्री गुरु निवृत्तीनी दाखवलेल्या खुणावरुन गेलो तर जन्ममृत्युशी परत भेट होणार नाही असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇