ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.230

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २३० 

कानी घालूनिया बोटे नाद जे पाहावे ।
न दिसता जाणावे नऊ दिवस ॥
भोवया पाहतां न दिसे जाणा ।
आयुष्याची गणना सात दिवस ॥

डोळा घालूनिया बोट चक्र जे पहावे ।
न दिसतां जाणावे पाच दिवस ॥
नासग्रीचे अग्र न दिसे नयनी ।
तरी तेचि दिनी म्हणा रामकृष्ण ॥
ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण ।
अतंकाळी आपण वेगी पहा ॥

अर्थ:-
कानात बोटे घालून नाद ऐकू आला नाही की, आपल्या आयुष्य नऊ दिवस उरले आहे असे समजावे.
भुवयांकडे नजर टाकून त्या दिसल्या नाहीत म्हणजे आपले

आयुष्य सात दिवस उरले आहे असे समजावे.डोळ्यात बोटे घालून चक्र न दिसल्यास आपले आयुष्य पाच दिवस उरले आहे असे समजावे.
नाकाचा शेंडा न दिसल्यास त्याच दिवसी मृत्यु आहे

असे समजुन रामकृष्ण नामाचा जप करावा.ही साधूनी सांगून ठेवलेली लक्षणे आहेत याचा अनुभव अतंकाळी ज्याचा त्यांना घ्यावा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

मृत्यूची लक्षणे,
मरणाची लक्षणे,
मृत्यूची ओळख,
मरण किती दिवस राहले कसे समजावे ?
मृत्यू किती दिवस राहला कसे समजावे?

MARAN KITI DIVAS RAHILE KASE SAMJAVE
MRUTYU KITI DIVAS RAHILA HE KASE JANAVE
MARANACHI LAKSHNE
MRUTYUCHI LAKSHNE

💐 👉 अंत्यसंस्कारानंतर….💐 👇

👉 काही तासांत रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल.

👉 तुमचे घरचे माणसं पहिले काही दिवस नातेवाईकांनी आणून दिलेले जेवण जेवतील व नंतर हळूहळू पुर्वस्थितीत येतील.

👉 नातवंडे धावत-खेळत राहतील.

👉 तुमच्या निघून जाण्यानंतर काही लोक तुमच्याबद्दल काही टिप्पणी करतील!

👉 दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात काही नातेवाईक कमी होतील, तर काहीजण भाजीत पुरेसे मीठ नसल्याची तक्रार करतील.

👉 जमाव हळूहळू पांगू लागेल..

👉 काही दिवसांनंतर, तुमचे घरचे तुम्ही कमावलेली संपत्ती कशा रितीने वाटून घ्यायची याची चर्चा सुरू करतील.

👉 येत्या काही दिवसात, तुम्ही मेला आहात हे माहीत नसताना काही कॉल तुमच्या फोनवर येऊ शकतात.

👉 दोन आठवड्यांत तुमचा मुलगा आणि मुलगी त्यांची आणीबाणीची रजा संपल्यानंतर कामावर परत जातील.

👉 महिनाअखेरीस तुमचा जोडीदारही कॉमेडी शो पाहून हुळूहळू हसायला लागेल.

👉 तुम्ही ज्या पदावर होता त्या पदावर आता दुसरा कोणीतरी व्यक्ती असेल.

👉 प्रत्येकाचे जीवन सामान्य होईल.

👉 जसे एखाद्या मोठ्या झाडाचे सुकले पान.

👉 आणि आपण कशासाठी जगतो आणि मरतो यात काही फरक नसतो.

👆 हे सर्व इतक्या सहजतेने, इतक्या सहजपणे, कोणतीही हालचाल न करता घडते.

👉 या जगात विस्मयकारक गतीने तुमचे विस्मरण होईल.

👉 दरम्यान, तुमची प्रथम पुण्यतिथी, प्रथम वर्षश्राद्ध मोठ्या दिमाखात केले जाईल.

👉 अतिवेगाने वर्षे उलटून जातील आणि आता तुमची कोणालाही आठवण येणार नाही.

👉 आता सांगा… 👇

👉 लोक तुम्हाला सहज विसरण्याची वाट पाहत आहेत.

👉 मग तुम्ही कशासाठी धावत आहात?

👉 आणि तुम्हाला कशाची काळजी आहे?

👉 योग्य आणि नैतिक मार्गाने संपत्ती कमवा, गरजेपेक्षा जास्त संपत्ती जमा करू नका.

👉 आयुष्य फक्त एकदाच मिळते, फक्त ते निस्वार्थी भावनेने व प्रेमळ मनाने जगा.

👉 इतरांपेक्षा स्वतः च स्वतः ला श्रेष्ठ समजवून इतरांना कमी लेखू नका, त्यांचा अपमान करू नका.

👉 आयुष्यात पद, सत्ता एका विशिष्ट वयानंतर येते आणि एका विशिष्ट वयानंतर निघून जाते,….

👉 होय, एक गोष्ट… 👇

👉 …आणि आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजूला प्रेमाने निरपेक्ष मदत करा, तो तुमची नेहमी आठवण ठेवेल.

👉 आपल्या अस्तित्वाचा अहंकार सोडा.

👉 सत्कर्म करत रहा.


*👆 हेच खरे जीवन आहे.

मृत्युनंतर पुढे काय ?

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *