दत्तात्रेयांचे सोळा अवतार सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

दत्त जन्माचे अभंग आरतीसह
श्री दत्त जन्माख्यान अध्याय
दत्त चरित्र, ओवीबद्ध सूची
दत्तात्रयाचे २४ गुरु संपूर्ण माहिती
दत्तात्रयांचे सोळा अवतार
दत्त संप्रदायातील सत्पुरुष संपूर्ण माहिती
गिरनार माहात्म्य

दत्तात्रयांचे सोळा अवतार :-

.१. योगिराज :-
🌷ब्रम्हदेवाचे मानसपुत्र ‘अत्रि’ हे पुत्र प्राप्तीसाठी पत्निसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन साक्षात भगवान कार्तिक शुध्द १५ स प्रकट झाले. त्यांचे रुप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते. दत्तात्रेयांचा हा अवतार ‘योगिराज’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी योगमार्गाचा पुरस्कार करुन लोकांना सुखी केले. म्हणून वरील नाव पडले. हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता…..

.२. अत्रिवरद :-
🌷अत्रिऋषीनी ऋक्ष पर्वतावरील पर्वतावरील परमतीर्थावर १०० वर्षे तप केले. तेव्हा त्यांना वर देण्याकरता ‘अत्रिवरद’ या नावाने हा योगिराज अवतरला. ब्रम्हा, विष्णू व महेश हे तिन्ही देव या तपाच्या वेळी अत्रिपुढे प्रकट झाले. आपण एकाचेच ध्यान करतो आहोत. मग हे तिघेजण कसे प्रकट झाले याचे आश्चर्य अत्रीना वाटले. तेव्हा ते म्हणाले,”तू ज्या एकाचे ध्यान करीत आहेस, तोच आम्हां तिघात आहे.’ या अत्रिवरदाचे रुप तप्त सुवर्णकांन्तीप्रमाणे तेजस्वी, हसतमुख व षङभुज होते…(जन्म :-कार्तिक कृष्ण प्रतिपदा)

.३. दत्तात्रेय :-
🌷अत्रिवरदाने अत्रिऋषीना वर मागण्यास सांगितले. तेव्हा तुमच्यासारखाच पुत्र असावा असा वर अत्रिंनी मागितला. त्यावर ‘तथास्तु’ म्हणून बालरुपातील आपले स्वरूप त्यांनी प्रकट केले. ते दिगंबर रुप मदनासारखे सुंदर व नीलमण्यासारखे तेजस्वी होते. मुख चंद्राप्रमाणे व हात चार होते. हाच दत्तात्रेयांचा ‘दत्तात्रेय’ नामक तिसरा अवतार….(जन्म :-कार्तिक कृष्ण २)

.४ कालाग्रिशमन :-
🌷यानंतर आपणांस औरस पुत्र असावा म्हणून अत्रि ऋषी पुन्हा तप करु लागले. या उग्र तपाने त्यांच्या शरिरात कालाग्नी प्रकट झाला व त्याचा दाह होऊ लागला. तेव्हा याचे शमन करण्यासाठी भगवान शीतल रुप घेऊन प्रकट झाले. म्हणूनच यास ‘कालाग्निशमन’ हे नाव पडले…(जन्म :- मार्गशीर्ष शुद्ध १५)

.५. योगीजनवल्लभ :-
🌷या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषि, गंधर्व, यक्ष व किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयानी आपल्या बालरुपाचा त्याग करुन योगीजनांना प्रिय असे रुप धारण केले. हे अवतार ‘योगिजनवल्लभ’ या नावाने प्रसिद्ध आहे….(जन्म :-मार्गशीर्ष शुद्ध १५)

.६. लिलाविश्वंभर :-
🌷दत्तात्रेयांचा सहावा अवतार ‘लिलाविश्वंभर’ ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्नान्न दशेस लागले होते तेव्हा दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला….(जन्म :-पौष शुद्ध १५)

.७. सिद्धराज :-
🌷भ्रमंतीत एकदा दत्तात्रेय बद्रिकावनात गेले. तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले. दत्तात्रेयांनी कुमार रुप धारण केले आणि अनेक चमत्कार करुन सिध्दांचे गर्वहरण केले, व त्या सर्वांना योगदीक्षा दिली. हा दत्तात्रेयांचा ‘सिध्दराज’ नावाचा सातवा अवतार….(जन्म :-माघ शुद्ध १५)

.८. ज्ञानसागर :-
🌷सिध्दीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी दत्तात्रेयांनी रुपातीत, गुणातीत, ज्ञानयोगमुक्त असे सहजस्थितीतील ‘ज्ञानसागर’ नावाचे रुप धारण केले….(जन्म :-फाल्गुन शुद्ध १०)

.९. विश्वंभरावधूत:-
🌷पुढे आणखी एकदा सिध्दांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी ‘विश्वंभरावधूत’ या नावाचा नववा अवतार घेतला व योगीजनांना बीजाक्षर मंत्रांचा (द्रां) उपदेश केला….(जन्म :-चैत्र शुद्ध १५)

.१०. मायामुक्तावधूत:-
🌷भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम व श्रध्दा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी ‘मायामुक्तावधूत’ या नावाचा दहावा अवतार घेतला…(जन्म :-वैशाख शुद्ध १४)

दहावा अवतार- मायामुक्तावधूत
एकदा शील नांवाच्या सदाचारसंपन्न ब्राम्हणाच्या इथे श्राद्धकर्म चालले होते.अचानक भगवान दत्तात्रेय तेथे भिक्शुरुपाने प्रकट झाले. अजानुबाहु, करी भिक्शापात्र, दैदिप्यमान सुवर्णकांती,कटीवर कौपिन, समोर छाटी, कंठी रुद्राक्शाची माळ असे मनोहर रुप माध्यान्ही दत्त म्हणुन उभे राहीले. भस्मविलेपित हे सुन्दर ध्यान आणि पाठीमागुन येणारा काळा कुत्रा, अश्या वेशात दत्तावधुत ब्राम्हणाघरी प्रकट झाले.त्यांना पाहुन सर्व ब्राम्हण संतापले आणि विचारु लागले–तू कोण आहेस? यावर श्री दत्तात्रेय म्हणाले, मी अप्रतीत, अस्वरुप असा अनंत नामांनी , अनंत रुपांनी नटलेला विश्वव्यापी अवधुत आहे. हे उत्तर ऐकुन त्या शील ब्राम्हणाला खात्री झाली की बद्रिकाश्रमात सिद्धांना उपदेश करणारे हेच भगवान सिद्धराज दत्तात्रेय.शील ब्राम्हणाने, दत्तप्रभूंची शोडशोपचारे पुजा केली. श्राद्धकर्म करावयास आलेले ब्राम्हण हे पाहुन खवळले आणि “अब्रम्हण्यम..अब्रम्हण्यम” असे म्हणत अवधुतांशी उद्धटपणा करु लागले. तेव्हा भगवान दत्तात्रेयांनी त्या ब्राम्हणांना प्रश्न केला, ब्रम्ह म्हणजे काय? कर्म म्हणजे काय?ते मला सांगा..मी एका आत्मरुपाशिवाय कशालाही ऒळखत नाही…
तेव्हा ब्राम्हण म्हणाले “ऒम हे एकाक्शर ब्रम्ह आहे. संध्या, वैश्वदेव, श्राद्धादि ही कर्मे आहेत. वेदांचे श्रवण करण्याचा अधिकार मात्र तुला नाही आणि आम्ही ते तुला सांगणार नाही..
त्यावर भिक्शुवेशधारी भगवान त्यांना म्हणाले, वेदांनी सांगितलेले कर्म त्रिगुणात्मक आहे. मी त्या त्रिगुणांना स्पर्शही करत नाही..ही त्रिगुणात्मक स्रुश्टिच माझ्या मागे श्वानाच्या रुपाने आली आहे. मायेने बनली आहे म्हणुन ते श्वान काळे दिसते. हा कुत्राच तुम्हाला चारी वेद म्हणुन दाखवेल. एका पट्टीच्या वैदिकाप्रमाणे तो कुत्रा चारी वेदांचा घोश करु लागला. या प्रसंगी शील ब्राम्हणाचे सर्व पितर पित्रुलोकातुन खाली आले व दत्तस्वरुपात विलीन झाले. दत्तत्रेयांच्या या अद्भुत शक्तिने ब्राम्हणांच्या गर्वाचा परिहार झाला. व ते देवाला शरण आले.
देवदेव जगन्नाथ, सर्वध्न्य परमेश्वर
देहि देहि तदस्माकं, ध्न्यानं दुःखविनाशकं..
अस्माकं भवकीटानां, कोन्यस्त्राता विना त्वया
त्रायस्य नः पुनः पाहि महात्मन पुरुशेश्वर

हा अवतार वैशाख शुद्ध चतुर्दशी, बुधवार, स्वाती नक्शत्र, माध्यान्ह काळी प्रकट झाला.


.११. मायायुक्तावधूत :-
🌷दत्तात्रेयांच्या अकराव्या अवताराचे नाव ‘मायायुक्तावधूत’ असे असून याचे रुप सावळे व सुंदर होते. मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मांस यांचे भक्षण सुरु होते. ही योगमाया होती…..(जन्म :-जेष्ट शुद्ध १३)

.१२. आदिगुरु :-
🌷दत्तात्रेयांचा बारावा अवतार आदिगुरु या नावाने प्रसिद्ध आहे. मदालसेचा पुत्र ‘अलर्क’ यास योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार धारण केला…..(जन्म :-आषाढ शुद्ध १५)

.१३. शिवरुप :-
🌷एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रगट झाले. हा दत्तात्रेयांचा ‘शिवरुप’ नावाचा तेरावा अवतार….(जन्म :-श्रावण शुद्ध ८)

.१४. देवदेवेश्वर :-
🌷दत्तात्रेयांचा ‘देवदेवेश्वर’ नावाचा चौदावा अवतार आहे….(जन्म :-भाद्रपद शुद्ध १४)

.१५. दिगंबर :-
🌷दत्तात्रेयांचा हा पंधरावा अवतार ‘दिगंबर’ या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या २४ गुरुंपासून काय काय ज्ञान घेतले याचा त्याला बोध केला….(जन्म :-आश्विन शुद्ध १५)

.१६. कमललोचन :-
🌷’कमललोचन’ नावाने सोळाव्या अवतारात दत्तात्रेय प्रकट झाले….(जन्म :-कार्तिक शुद्ध १५)

१६) श्रीकृष्णश्यामकमललोचन :-
सर्व देव,धर्म,सृष्टी इत्यादींची विविधता ही कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ‘श्रीकृष्णश्यामकमललोचन’ रुपात भक्तांना एकच भक्तिमार्गाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला.
या सोळा दत्त अवतारांचा दत्त उत्सव हा संपूर्ण हिंदुस्थानात केवळ अंबेजोगाईला विशेष मुहूर्तावर साजरा केल्या जातो, दासोपंतांच्या अंबेजोगाई येथील ” देवघर” या मंदिरात आजही पंचधातूतील या सोळा दत्त अवतारांच्या मूर्ती भक्तांना दर्शनास उपलब्ध आहेत, याबाबत विस्तृत माहिती “श्री दत्तात्रेय षोडशावतार चरितानि” पुस्तकात श्री वासुदेव निवास प्रकाशन पुणे, येथील प्रकाशक श्री श. ज. जोशी यांनी प्रकाशित केली आहे.
वरील सोळा अवतारांचे अवलोकन केल्यास त्यांचे षोडशकलांशी म्हणजेच गुणांचे साधर्म्य असल्याचे जाणविते, कारण अवतार हे विशिष्ट कार्यासाठी, विशिष्ट गुणधर्म अंगीकृत असलेले असतात.
तिन्ही लोकाची रचना अणि महत्वाच्या आदि तत्वांनी युक्त १६ कलांनी परिपूर्ण असा पौरुष अर्थात मनुष्य शरीराचा भगवंताने स्वीकार केला.
जगृहे पौरुषं रूपं भगवान् महादादिभि:।
सम्भूतं षोड़शकलमादौ लोकसिसृक्षया ॥
(संदर्भ श्रीमद् भागवतम् १.३.१)

गीतेत ईश्वराचे वर्णन जिथे आहे, तिथे “मासानां मार्गशीर्षोऽहम” अणि “ऋतुनां कुसुमाकर” हा उल्लेख दुजोरा देऊन जातो, दत्त जयंती उत्सव मास पण मार्गशीर्ष अाहे.

मनुष्यातील १६ विशिष्ठ गुण अथवा शक्तिंना सुध्दा षोडशकला म्हटल्या जाते, त्याची प्रचीती वैदिक ग्रंथात आढळते
“षोडशकलो वै चन्द्रमः षोडशकलो वै पुरुषः” (शतपथ ब्राम्हण )

पूर्णब्रह्म सुध्दा षोडशकला म्हणून वर्णित आहे

“षोडशकलो वै ब्रह्म” (शतपथ ब्राम्हण)

इतकेच नाही तर संपूर्ण जगताला सुध्दा हिंदु धर्म षोडशकला युक्त मानतो

“षोडशकलं वा इदं सर्वं (शतपथ ब्राम्हण)

१६ कलांच्या बाबतीत अत्यंत मार्मिक विवेचन संदर्भकार श्री जीवगोस्वमी करतात

‘ ताः कला षोडश प्रोक्ता: वैष्णवै: शास्त्रदर्शनात्।
शक्तित्वेन तु ता: भक्त विवाकादिषु सम्मता:॥
श्रीर्भु: कीर्तिरिला कान्तिर्लीला विद्येति सप्तकम्।
विमलोत्कर्षिणी ज्ञाना क्रिया योगा तथैव च।
प्रह्वी सत्या तथेशानानुग्रहेति नव स्मृताः ॥’

अर्थात् श्री, भू, कीर्ति, इला, कान्ति, लीला, विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, प्रह्वी, सत्या, ईशाना और अनुग्रहा या १६ वैष्णव शक्ति आहेत, यात विशेष अणु असलेले सर्व समाविष्ट आहेत,
श्रीदत्तात्रेयांच्या सोळा अवतारांचे साम्य अणि सोळा कला यात साम्यता आढळते, याबाबत दासोपंत अथवा प.पू वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी कुठेच उल्लेख केलेला नाही, पण तो संकेत अप्रत्यक्षपणे यातून प्राप्त होतो.
श्री दत्तगुरु अवधूत आहेत सर्वांचे हितकर्ते, क्षमाशील, योगी अणि कृपाळू आहेत, अवधूत शब्दाचा अर्थ ‘अ’ अविनाशी, ‘व’ वरेण्य अर्थात सर्वश्रेष्ठ, ‘धू’ पवित्र, निर्मळ ‘त’ तत्वामसि परब्रम्ह, म्हणून

*🔸श्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार 🔸*

सातवा अवतार- सिध्दराज श्री दत्तात्रेय

सद्गुरु भगवान श्री दत्तात्रेय यांचा सातवा अवतार म्हणजे “सिध्दराज” या नावाने प्रसिध्द आहे. लीलाविश्वभंर दत्त या नावाने अवतरुन अपेक्षित असलेले सर्व कार्य पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रेयप्रभूंनी सिध्दराज या नावाचा अवतार घेतला.

सदगुरु श्री लीलाविश्वंभर देव हे एकदा स्वत:चे रुप लोकाच्या लक्षात येऊ न देता बालरुपाने प्रकट झाले व भूतलावर इतस्तत: पर्यटन करीत करीत हिमाचल प्रदेशातील बदरिकावनात एकटेच प्रविष्ट झाले. तेथे अनेक सिध्द् लोक वास्तव्य करीत होते. त्यांनी खडतर तपश्चर्या करुन कष्टसाध्य अशा सिध्दि मिळविलेल्या होत्या. त्या सिध्दिंच्या जिवावर ते अनेक प्रकारचे सुखे भोगीत व चैन करीत काळ कंठीत होते. सिध्दिंच्या बळावर ते खूपच कामाक्रोधदि विकारांच्या आहारी गेलेले होते. कोणी लंगोटी परिधान करुन तर कोणी नग्न अवस्थेतहि राहत होते. कोणी मौन धारण करुन बसलेले होते, तर कोणी आत्मप्रौढींचे वर्णन करण्यात गर्क झालेले होते. कोणी आस्तिकांचा पक्ष घेऊन तर कोणी नास्तीकांचा पक्ष घेऊन निरनिराळया विषयांवर वादविवाद करीत बसलेले होते.

एकदा त्या सिध्दांचा मेळावा एका ठिकाणी जमला होता. त्या मेळाव्यात लीलाविश्वंभर दत्तात्रेय हे बालरुप धारण करुन सर्वांच्या मागे जाऊन बसले. सर्व सिध्दांच्या स्वभावाची परीक्षा पाहणे व त्यांच्या गर्वाचा परिहार करणे हा उद्देश्य दत्तात्रेयांनी मनात ठेवलेला होता.

दत्तात्रेयांचे ते अत्यंत तेजस्वी व दिव्य बालरुप पाहून सर्वांची दृष्टी त्यांच्याकडे आकृष्ट झाली. अत्यंत मनोहर असलेले बालयोगी भगवान दत्तात्रेय योगमूद्रेने बसलेले होते.

दत्तात्रेयांना ऐटीत बसलेले पाहून सर्वांनी त्यांना प्रश्न केला,

“बाळ तु कोण आहेस ?”

त्यांचा हा प्रश्न ऐकून दत्तात्रेय म्हणाले, “माझे स्वरुप कोणाच्याही प्रतीतीला येणारे नसल्यामूळे मला अप्रतितस्वरुप म्हणतात”

“तूझा आश्रय कोण आहे ते तरी सांग ?”

दत्तात्रेय म्हणाले, “मला कोणी आश्रय नाही व माझा कोणी आश्रय अथवा संरक्षकहि नाही.”

“तुझा योग कोणता व त्याच्या अभ्यासाची रीत कोणती ?”

दत्तात्रेय म्हणाले “ माझ्या योगाला मी चित्रयोग हे नाव दिलेले असून त्याच्या अभ्यासाची काही प्रक्रिया नाही.”

यावर सिध्दांनी विचारले, “तुझा गुरु तरी कोण आहे?

त्यावर दत्तात्रेयांनी उत्तर दिले की, ” मला कोणी गुरु नाही.”

पुन्हा सिध्द म्हणाले, “तुझी मुद्रा कोणती, वैष्णवी की शांभवी ?

सिध्दराज म्हणाले “माझी ही करुणात्मक मायेच्या पलीकडची निरंजनी मुद्रा आहे.”

“अरे ती कशी असते ?”

“जसा मी आहे तशीच ती असते.”

“अरे या मूद्रेत तुला काय दिसत आहे ?”

सिध्दराज दत्तात्रेय म्हणाले, “ध्यानातील अवस्थेत जे प्रचीतीला येते अर्थात ध्याता, ध्यान आणि ध्येय या त्रिपुटीच्या पलीकडचे जे काही तत्व आहे तेच माझे ध्येय होय.”

याप्रमाणे ती सिध्दमंडळी व भगवान श्री दत्तात्रेय यांचा वादविवाद चालला असताना आकाशमार्गाने जात असलेले अकरा रुद्रा, बारा आदित्य, अष्ट वसू आणि त्याचप्रमाणे एकोणपन्नास मरुद्रगण तसेच महर्षि, साध्यदेव, यक्ष, गंधर्व व किन्नर हे जात असता त्यांची गति कुंठित होऊन ते सर्व भूतलावर त्या ठिकाणी अवतरले. त्यांना पाहून ती सर्व सिध्दमंडळी आश्चर्यचकित झाली. सिध्द लोकांना वाटले हे त्यांच्या सिध्दीचे फळ आहे व त्यामूळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यांचा तो परस्परांमध्ये चाललेला कलह पाहून श्री दत्तात्रेय त्यांना म्हणाले.

“सिध्दजनहो तुम्ही आपसात हे भांडण का करीत आहात तुम्ही सर्वच श्रेष्ठ आहात, पण तुमच्यात अधिक श्रेष्ठ कोण आहे याचा निर्णय घेण्याची सोपी युक्ती मी तुम्हांला सांगतो. गति कुंठित होऊन भूमंडलावर या ठिकाणी उतरलेले हे सर्व देव आणि इतर लोक ज्याच्या शब्दाने पुन: वर जातील तो तुम्हा सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असे समजा.”

त्यांचे भाषण ऐकून सर्व सिध्दजनांनी प्रयत्न केले पण एकाच्याही शब्दाचा उपयोग झाला नाही. कोणीही देव अथवा ऋषि मुनी आपआपल्या स्थानी हलूहि शकले नाही.

यामुळे आपण खूप मोठी सिध्दी मिळवलेली आहे असे मानणारे ते सर्व सिध्दलोक अत्यंत लज्जित झाले. त्यांचा क्रोध मावळला. अहंकार पार गळाला. ते सर्व सिध्द निस्तब्ध झाले. त्यानंतर सिध्दराज श्री दत्तात्रेय म्हणाले “देव हो, ऋषि-मुनिजनहो तुम्ही सर्व आपआपल्या स्थानाला सत्वर जाऊन पोहोचावे. मी तुमचा प्रतिबंध दूर केला आहे. तुम्ही तिळमात्रही चिंता न करता आनंदाने आपआपल्या स्थानाला जावे. माझा तुमच्यावर अनुग्रह आहे.”

हे शब्द ऐकल्याबरोबर सर्व मंडळी एका क्षणात आपापल्या स्थानाला जाऊन पोहोचली. हे पाहून बदरिकाश्रमातील सर्व सिध्द महात्मे आश्चर्यचकित झाले व म्हणू लागले, खरोखर हा प्रत्यक्ष परमात्माच बालरुपाने आपल्यापुढे आवतरला आहे. सर्व सिध्दांनी दत्तात्रेयांच्या चरणी सादर प्रणिपात केला. देव व सिध्द यांनी त्या ठिकाणी दत्तात्रेय यांची मुक्त कंठाने स्तुति केली. सर्व सिध्दांना सिध्दी देणाऱ्या दत्तात्रेयांना “सिध्दराज” असे नाव देण्यात आले.

रहस्य, न्यास, कवच इत्यादि सर्व तांत्रिक पध्दतींचाही उपदेश त्यांनी केला. सिध्दराजांनी स्वत:च हि शास्त्रपध्दत सांगितलेली असल्यामुळे या पध्दतीला सिध्दराजगम असे म्हणतात. ही सिध्दराज पध्दत श्री दासोपंत यांनीही उपदेशीली आहे. दासोपंतानी ती लिहूनही ठेवलेली आहे. हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ सिध्दराजगम या नावाने प्रसिध्द आहे.
🌐🌐🌐🌐🌐🏀🌐🌐🌐🌐🌐

आठवा अवतार “ज्ञानराज”

श्रीदत्तात्रेय यांचा आठवा अवतार “ज्ञानराज” हा होय. एकदा विश्वगुरु भगवान श्रीदत्तात्रेय एकांतामध्ये बसले असता विचार करु लागले की. हे सिध्द लोक माझ्या उपदेशाने सिध्द झाले खरे पण जोपर्यंत कामक्रोधादि विकार समूळ नष्ट होत नाहीत तोपर्यंत खऱ्या शांतीचा व सुखाचा त्यांना लाभ होणार नाही. काम हा सर्व दु:खांचे मूळ आहे व कामामूळेच जीव हा सतत संसारामध्ये धडपड करीत असतो. काम हाच कर्ता व करविता आहे. कामाच्या जोडीला क्रोधहि पाठोपाठ धावत येतोच, हे सर्व जगच कामाच्या आधिन आहे. काम म्हणजे इच्छा. मनात इच्छेचा अंकूर निर्माण झाला की त्या इच्छेतून दूसरी इच्छा, दुस-या इच्छेतून तिसरी इच्छा  निर्माण होते. अशा रीतीने हे सर्व जग विषयाभिलांषांच्या जाळयात सापडतं व चिंतेने त्रस्त होते, तेंव्हा सिध्दराज दत्तात्रेय मनाशी विचार करतात की, मला या सर्वांना या कामाच्या जाळयातून सोडविले पाहिजे. या लोकांना ज्ञानानेच सायुज्याचा लाभ होईल व ते पूर्ण सुखी होतील, असा विचार करुन परमदयाळू भगवान श्रीदत्तात्रेय ते पूर्वीचे त्रिगुणातीत आणि नित्य शुध्द, बुध्द, मुक्ता असे आपले स्वाभाविक रुप व आपली सहजावस्था क्षणभर बाजूला ठेवून पुन्हा कौमाररुप धारण करुन प्रकट झाले. हा दत्तात्रेयांचा आठवा अवतार होय. या अवताराला “ज्ञानसागर” असे अनुरुप नाव देण्यात आले.

ज्ञानसागर हा दत्तात्रेयांचा आठवा अवतार फाल्गुन शुक्ल पक्षातील दशमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाच्या वेळी झाला. त्यावेळी पुनर्वसू नक्षत्र होते.

बदरिकाश्रमातील सिध्दांचा समुदाय ज्या ठिकाणी बसला होता तेथे डोक्याइतक्या उंच स्थानावर आकाशात अधांतरी विराजत असलेल्या दत्तात्रेयांना पाहून त्याचा प्रभाव सहन न झाल्यामुळे दत्तात्रेयांच्या त्या सिध्दीचा अथवा शक्तीचा पराभव करण्याचा विडा उचलला. सर्वांनी आपापल्या परीने दत्तात्रेयांना खाली आणण्याचा प्रयत्न केला पण ते काही दत्तात्रेयांना स्वस्थानापासून तिळमात्रहि हलवू शकले नाहीत. त्यांच्या त्या प्रयत्नाने दत्तात्रेयांची मुद्रा तिळमात्र ही ढळू शकली नाही. तेव्हा सर्व सिध्दांची खात्री झाली की हा कोणी सामान्य सिध्द नसून साक्षात परमात्माच आहे. असे समजून त्यांनी दत्तात्रेयांना नमस्कार केला.
🌐🌐🌐🌐🌐🏀🌐🌐🌐🌐🌐
🌺संकलन-गुरुवर्यांचा चरणरज-सुरज राकले, पुणे (पंढरपुर). मोबा.- +919823763839🌺

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *