ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.301

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३०१

दृष्टीचे सुख अंतरी देख । ओंकार अरुष बोलताती ॥१॥
नादुले ऐकसी बिंदुले न देखसी । कोंदलें चौपासी सावरेना ॥२॥
तें आतु ना बाहेरी आणि अभ्यंतरी । एकलेंचि निर्धारी वसतसे ॥३॥
उफराटिये दृष्टि निवृत्तीच्या शेवटी । ज्ञानदेवा भेटी होऊनी ठेली ॥४॥

अर्थ:-

आत्मज्ञानाचे सुख अंतःकरणातच पहा.नुसत्या ओंकाराच्या गोष्टी बोलणे फुकट आहे. तु नाभिस्थानाच्या ठिकाणी उत्पन्न होणारा नाद ऐकतोस परंतु बिंदु या पदाने बोध करुन देणारे परमतत्त्व पाहत नाहीस. ते परमतत्त्व एवढे कोंदाटले आहे

की त्याची व्याप्ती अगाध असून ते आंतबाहेर सर्वत्र आहे. अंतर्मुख दृष्टीनी निवृत्तीच्याही शेवटी असलेल्या परमात्मतत्त्वाची भेट मला झाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *