संत चोखामेळा म. चरित्र १०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा भाग  –  १०.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

साधुंनी सांगीतलेल्या भविष्य वाणीने चोखोबांच्या दृष्टीकोणात बदल तर झालाच पण सर्वसामान्यासारखे सरळ जीवन जगणार्‍या चोखोबांना आयुष्याचा वेगळा विचार करणही भाग पडले.तत्क्षणी त्यांना नामदेवांची प्रकर्षाने आठवण आली.मनांतील प्रश्नांचे अन्वयार्थ त्यांच्या भेटीची तिव्र ओढ लागली.पण एक महिन्यावर लग्न आलेले असतांना,आई आपल्याला पंढरपूरला  जाऊं देईल कां?अश्या मनःस्थितीत आपण लग्नाला उभे राहुं शकु का?मनांत प्रश्नांचे चक्रीवादळ  गरगरत असतांनाच त्यांना एक युक्ती सुचली.नामदेवांचे नांव पंचक्रोशीत गाजत होतेच शिवाय आईला   त्यांच्याबद्दल सांगीतले होतेच.तोच आधार घेऊन,नामदेवांना लग्नाचे आवतन देण्याच्या निमित्याने पंढरपूरला जाऊन त्यांची भेट घ्यायचे ठरवल्यावर त्यांना थोडे बरे वाटले. चोखोबांच्या चेहर्‍यावरील फेरफार बैलगाडीत बसलेली सावित्री लक्ष देऊन पाहत होती.साधूच्या भविष्य वाणीने चोखांत झालेल्या बदलाने ती थोडी धास्तावली होती,पण त्यांनी नामदेवाना आवतन व त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी पंढरपूरला जाण्याची अनुमती मागीतल्यावर तीने तात्काळ संमती दिली.

चोखोबाचा साखरपुडा आनंदाने बघणार्‍या विठूरायाला आनंद तर झालाच,पण चोखांनी नुसते संसारांत अडकुन पडु नये म्हणुन,साखरपुड्याच्या आठवणीत दंग असलेल्या चोखोबांना भानावर आणण्यासाठी साधू होऊन भविष्यवाणी सांगीतल्याक्षणी त्यांना नामदेवांची आठवण झाली हे पाहुन विठु रायाला आपली योजना सफल झाल्याचा आनंद झाला.क्षुद्र जातीत जन्मलेल्या या भक्ताकडुन लोकोत्तर कार्य करवुन घ्यायचे होते,म्हणुनच संसारात बुडुन ईप्सित कार्यापासुन ढळणे देवाला मान्य नव्हते.भक्ती आणि संसार या दोन समांतर पातळीवर चालण्यासाठी मानसिक बैठक तयार व्हावी म्हणुनच नामदेवांची सतत संगत लागणं नितांत गरजेचे होते.

आईची संमती घेऊन विचारांच्या आवर्तनात चोखोबा पंढरपूरला पोहोचले.  चंद्रभागेच्या काठावर,विठ्ठलमंदिराच्या समोर ओवरीत वास्तव्य असलेल्या नामदेवासमोर चोखोबा जाऊन उभे राहिले.नामदेवांनी अत्यंत अगत्याने त्यांना जवळ बोलावले. चोखोबानी त्यांच्या पायावर डोके ठेवल्याबरोबर नामदेवांनी त्यांच्या खांद्याला धरुन उठवले व ह्रदयाशी धरले.जणूं जिवा शिवाची भेटच ती!नामदेवांनी आस्थेने चौकशी करुन येण्याचे प्रयोजन विचारले चोखा घुटमळलेले,त्यांच्या हालचालीतील अस्वस्थता पाहुन जमलेल्या मंडळींना उद्देशुन म्हणाले,मंडळी पुढच्या महिन्याती ल एकादशीला ठरलेल्या विठ्ठलनामाच्या सप्ताहाला सावतामाळीचाही सल्ला घेऊ असा प्रेमळ निरोप दिल्यावर मंडळी निघुन गेली.आतां ओवरीत दोघेच होते.

चोखोबाने आणलेल्या शिदोरीतुन बाजरीची भाकरी,तिळाची चटणी व कर्डु च्या भाजीचा गोळा ठेवुन अत्यंत आदराने नामदेवांना दिली.हं! बोला चोखोबा! निःसंकोच बोला!पांडुरंगाच्या आणि आपल्या आशिर्वादाने माझ्या ठरलेल्या लग्नाचे आवतन द्यायला आलो वा!वा! छान!आपल्या विठुरायानेसुध्दा रुख्मिणीमातेशी संसार करतच भक्तांचा हा मेळावा सांभाळला आहे.पण एवढी आनंदाची गोष्ट घडत असतांना चेहर्‍या वर गोंधळ कां? मग चोखोबांनी साखर पुड्याहुन परतत असतांना अनपेक्षितपणे  भेटलेला साधू,त्याने केलेली भविष्यवाणी घडलेला सारा प्रसंग जसाच्या तसा सांगीतला.

हे सर्व ऐकल्यावर नामदेव क्षणभर स्तब्ध झाले.दुसर्‍याच क्षणी आनंदाने म्हणाले, हा तर शुभशकुन झाला.तुमचा संपूर्ण जीवनपट असा विलक्षण आणि विठ्ठलभक्तीच्या तेजाने उजळणार आहे.मृत्युसंदर्भात म्हणाल तर त्याला अजुन कित्येक वर्षे वेळ आहे. आनंदाने व सुखाने खुप वर्ष संसार करा. आणि तितक्याच उत्कटतेने,प्रेमाने पांडुरंगाची भक्ती करा.साधूने सांगीतले ली भविष्यवाणी तर खरी ठरणारच.आनं दाने व प्रसन्न मनाने भाकरी खाणार्‍या नामदेवांना बघून लोणी खाणार्‍या कृष्णा ची आठवण झाली.मनांतील सारी किल्मिषं दूर झाल्यामुळे खुल्या दिलाने चोखोबा लग्नाला उभे राहणार होते. पंढरपूरला जायला चोखोबांना परवाणगी देतांना,सावित्री थोडी धास्तावली होती.पण चारच दिवसांत आनंदी मनाने परतलेल्या चोखोबांना पाहुन तिचा जीव भांड्यात पडला. उत्साहाने सावित्री लग्नाच्या तयारीला लागली.लग्नाचा दिवस उजाडला.निर्मळा नटून थटून इकडे तिकडे बागडत होती. बाशिंग बांधलेला चोखोबांना दूरुन येणारे नामदेव दिसल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर समाधान पसरले.डोळ्यांतुन आनंद ओसरु लागला.पुढे जाऊन त्यांच्या पाया वर डोके ठेवावेसे वाटले,पण जागेवरुन हलायचे नाही अशी सक्त ताकीद असल्यामुळे…..

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *