दृष्टांत 53 कर्म, कर्त्याला शोधून कर्मफळाची, परतफेड करते

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
 *♦️ कर्माची परतफेड ♦️*

एकदा राजाने आपल्या तीन मंत्र्यांना ‘तुम्ही जंगलात जाऊन एक एक पोते भरून फळे घेऊन या’, असा आदेश दिला.

पहिल्या मंत्र्याने विचार केला की, प्रत्यक्ष राजानेच आपल्याला फळे आणायला सांगितली आहेत, म्हणून आपण चांगल्या प्रतीचीच फळे घेऊन गेले पाहिजे. त्याप्रमाणे त्याने चांगली फळे शोधून घेतली.

दुसऱ्या मंत्र्याने विचार केला की, राजाने सांगितले आहे तर खरे, पण राजा तर इतर कामात इतका व्यस्त असतो की, तो कशाला एक एक फळ तपासून पाहणार आहे? म्हणून त्याने मिळतील ती चांगली वाईट फळे आणली.

तिसऱ्या मंत्र्याने विचार केला की, राजा कशाला पोते उघडून पाहणार आहे की, त्यात फळे आहेत की आणखी काही ? तो तर बाहेरून फक्त पोत्याचा आकार पाहील, म्हणून त्याने जंगलात न जाताच पाला पाचोळा आणि फळांच्या आकाराचे दगड धोंडे भरून आणले.

दुसऱ्या दिवशी तिघेही मंत्री आप आपली पोती घेऊन दरबारात हजर झाले. फळे काय आणि किती आणलीत हेही न पाहता राजाने प्रधानजींना आदेश दिला की, या तिघांनाही राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी एक महिना स्थानबद्ध करण्यात यावे आणि त्यांनी जमा करून आणलेल्या फळां व्यतिरिक्त इतर आहार त्यांना देण्यात येऊ नये.

पहिल्या मंत्र्याने चांगली फळे जमा केली होती, त्यामुळे त्याने चांगली फळे खात खात एक महिना मजेत घालवला.
दुसऱ्या मंत्र्याने जी काही चांगली फळे जमा केली होती त्यावर थोडे दिवस चांगले घालवले पण पुढे कच्ची आणि सडलेली फळे खावी लागल्यामुळे तो आजारी पडला.
तिसऱ्या मंत्र्याने दगडधोंडेच जमा करून ठेवल्यामुळे त्याची तर पहिल्या दिवसापासूनच उपासमार झाली.

              *🔅 तात्पर्य :~*

चांगल्या वाईट कर्माचे फळ योग्य वेळ येताच त्याच्या त्याच्या कर्त्याला न चुकता शोधून काढते.

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 27

दृष्टांत सूची पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *