ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.195

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग १९५माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ं १९५

प्रपंचाचे जगदाळ दुस्तर करूनि केऊता जासी । जें जें त्यागिले तें तें तुजमाजीं । त्यागिले तें काय सांगु आम्हांसी । तुझे तुजचिमाजी प्रपंचेसि तूं सर्वांमाजी वर्तसी । ऐसे जाणोनियां कां विटंबिसी बापा । टाकूनि केऊता जासी रया ॥ मनेंसि विचारी निर्धारूनी योग करीं ।

तुझे तुजमाजी अरे विचारी आतां बापा । अरिमित्रसम होऊनि मन हे शुद्ध होय तेंचि तूं होऊनि राहे जाण बापा ॥ बाह्य त्यागिसी तरी तो त्यागुचि नव्हे पालटिसी तरी ते विटंबना । धरिसी तरीचि तो बंधु मोक्ष मागता हे जडपणा । तरी गेलिया जड तो मोक्षचि नव्हे साचा चुकलासी उगाणा ।

वृत्तिशून्याकारे अवलोकितां तंव तेणे नव्हे तुज वस्तुज्ञा़ान । ऐसें जाणूनि की सिणगी रे बापा । हेचि धरूनी राहे निजखुणा रया ॥ म्हणोनि आत इतुके करी । साच तें हें धरी तुझे मन होय तुज अधिकारी । हें सर्वही त्याग तुज फळती बापा । जै एकचि होऊनि निर्धारी

नलगे शिणणे दंडगे येणें आश्रमभावें ऐसेंचि ने निधारी । बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतितां सर्व प्रपंचाची जाली बोहरी । निवृत्ति राये खुणा दाउनी सकळां । निज निजाचे निज निर्धारी रखा

अर्थ:-

प्रपंचाचे अवडंबर करुन त्यातुन तरणे दुस्तर आहे. ते त्यागुन तु कोठे जाणार? जे जे टाकायला जाशिल ते तुझ्या मनात सोबत आहे. मग तु कसला त्याग करणार ते आम्हाला सांग? जे तुला टाकायचे आहे त्यात तु वासनारुपाने आहेस. असे जाणुन ही तु स्वतःची विटंबना का करतोस? हे टाकुन तु कोठे जाणार?

आपल्याला काय साध्य करायचे ह्याचा योग्य विचार मनात करअरिमित्रा(विजिगीषु) प्रमाणे मन शुध्द करुन घे. हे तु जाण. बाह्य त्याग हा त्याग नसुन ती विटंबना आहे. पण वासनारुप बंध मनात असताना मोक्ष कसा कसा मागता येईल? तरी तो मोक्ष मागायला गेलास तर तो संन्यास किंवा मोक्ष नसुन रिकामा शीण होईल. वृत्तीशुन्य करुन परमात्मवस्तुचे ज्ञान मिळवले हे प्रयत्नपुर्वक कर हीच तुझी निजखुण समज. मग आता इतकेच कर जे सत्य आहे तेच मनात धर त्यामुळे तु आधिकार प्राप्त होशिल.

त्यामुळे हे सर्व त्याग तुला फळ देतील उगाच दंडण मुंडण करुन शिणण्याचा उपयोग नाही. हाच आश्रमभाव हे जाण.माझे पिता व ऱखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन करता प्रपंचाची बोहरी होते. हीच खुण निजाचे निजतत्व निजरुपी दाखवुन निवृत्तीनाथांनी दाखवली असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *