ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ४०

नवाहुनि परतें तेंराहुनि आरुते । अंबरहुनि परतें काळे दिसे ॥ तेथें सातही मावळलीं पांचांहूनि परतें । बाहुकाळे निरुते देखिले डोळा ॥

तेथे सत्रावी दुभते योगिया पुरते । बहुकाळ निरुते सारासार देखा ॥ बापरखुमादेविवरू अभोक्ता भोगिला । काळेपणे जाला अमोलिक ॥

अर्थ:-
पाच ज्ञानेंद्रिये व मन बुध्दी चित्त व अहंकार मिळुन नऊ व दहा इंद्रिय मन बुध्दी व चित्त असे तेरा अशा नऊ व तेरा ह्याऊन वेगळे असलेले हे रुप आकाशाच्या पेक्षा काळे आहे. सप्त धातु व पंच प्राण ह्या

पेक्षा निराळे असलेले असे बहु काळे असलेले वेगळे असणारे रुप मी पाहिले आहे. सतरा परमानंदाच्या कळा असलेले योगियांच्या पुरते असलेले सारासाराचे सार असलेले ते स्वरुप आहे. मी त्याच्या काळेपणा अनमोल मानुन अभोक्ता अ़सलेल्या रखुमाईच्या पतीला भोगला असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

  1. […] ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३१,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३२,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३३,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३४,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३५,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३६,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३७,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३८,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३९,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ४०, […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *