ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.३९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३९

मन मुरडोनी डोळा लेईले । काळेपणे मिरवले रूप त्यांचे ॥ बरवे रूप काळे अमोलिक । म्हणोनिया सांगतसे शुद्ध भावे ॥

रखुमादेविवरू अगाध काळे । म्हणोनि सर्वत्र व्योम अर्पियेले ॥

अर्थ:-

त्याचे काळेपण मिरवत असलेले रुप मी पाहिले तेंव्हा मन मारुन मी

डोळ्यात साठवले. तेच काळेपण अनमोल असुन तेच मी शुध्द भावाने वर्णित आहे. ज्याने सर्व आकाश व्यापले तो रखुमाईचा पती अगाध (ठाईचा ) काळा आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *