ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१५६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-५ रे, नामग्रहण अभंग १५६

जप तप अनुष्ठान । नित्य आमुचें रामघन । रामकृष्ण नारायण । हाचि जिहार सर्वदा ॥ जयाशी अमृत घट । रामकृष्ण घडघडाट । हेखि पूर्वजाची वाट । सर्व जीवाशी तारक ॥

गोविंद गोविंद राम । सर्व साधिलें सुगम । नलगे उत्तम । रामकृष्ण पुरे आम्हां ॥ ज्ञानदेव आन ध्यान । राम राम नारायण । इतुकेंचि पुरे अनुष्ठान’ ॥ हेंचि जीवन शिवाचे ॥

 अर्थ:-

रामकृष्ण नारायण हेच आमचे जप तप अनुष्ठान व हेच आमचे जिव्हार व धनही आहे. ज्याच्या जवळ रामकृष्णनामाचा घडघडाट करणारा घट आहे ते सहज अमर होतात ह्याच मार्गे आमचे पुर्वज गेले

गोविंद नामाचा तप हाच सोपा जप असुन रामकृष्णनाम हेच पुरेसे आहे.बाकी तपांची गरज नाही.राम नारायण ह्याचाच जप स्वतः महादेवांनी केला त्यामुळे त्याचेच अनुष्ठान आम्हास पुरे आहे असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *