ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१४४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १४४

सार सार सार विठोबा नाम तुझ सार । म्हणोनि शूळपाणी जपताहे वारंवार ॥ आदि मध्य अंती निजबीज ओंकार । ध्रुव प्रल्हाद अंबऋषी मानिला निर्धार ॥

भुक्तिमुक्ति सुखदायक साचार । पतीत अज्ञान जीव तरले अपार ॥ दिवसेंदिवस व्यर्थ जात संसार । बापरखुमादेविवर विठ्ठलाचा आधार ॥

अर्थ:-

सर्व शास्त्रांचे सार हे विठोबाचे नाम आहे.म्हणुन साक्षात महादेव त्याचा सतत जप करत असतात. हे नामच ॐकार स्वरुप असुन तेच आदि, मध्य व अंत असणारे निजबीज आहे त्याचाच जप ध्रुव, प्रल्हाद व अंबऋषीनी केला

.ते नाम भक्ती,मुक्ती व सुख दायक असुन त्यामुळे अनेक पतित अज्ञानी जीव तरुन गेले. संसारामुळे तुमचा एक एक दिवस वाया जात असुन माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या नामाचा आधार सोडु नका असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *