ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१२९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १२९

संपत्तिविपत्ति दुःख । हरेल अवघा शोक । वेगीं करूनियां विवेक । हरिस्मरण करी ॥ मंत्र यंत्र सूत्रधारी । सिद्ध साध्य तोचि हरी । नित्य जपोनि वैखरी । आप्तता करी हरीसी ॥ ध्यान मन एक

चित्त । अलक्ष लक्षी अच्चुत । न सांगे हिताची मात । अखंड जपे हरिनाम ॥ ज्ञानदेवें जप केला । मग समाधीस बैसला । नाम घेतां बोध झाला । देव आला हृदयासी ॥

अर्थ:-

विवेकाने हरिस्मरण करणाऱ्याला संपत्तीचा वियोग होत नाही त्याचे दुःख व शोक याचे हरण होते. मंत्र व तंत्र सिध्द होण्यासाठी तोच सुत्रधार असणारा हरि आहे व अशा हरिला वैखरीने हरिनाम घेऊन आप्त करुन घे.

त्याचे ध्यान व मनन चित्तात करुन आपले लक्ष हे अच्युत प्राप्ती करावे व ते फक्त हरिनामे साध्य होते ही हिताची गोष्ट सांगतो. मी समाधीला बसताना त्याचे स्मरण केले त्याच्या नामाचा बोध घेतला व त्यामुळे स्थापित झाला असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *