ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.273

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २७३

मेरूपरतें एक व्योम आहे । तेथे एकु पाहे तेज:पुंजू ॥ तेज नव्हे तेज:पुंजू नव्हे । शितळ नव्हे शांतही नव्हे ॥ बाप रखुमादेविवरू विठ्ठलही नव्हे । नव्हे तो होये चतुर्देहेंवीण ॥

अर्थ:-

स्वर्ग, मृत्यू, पातळ हे मेरू पर्वताच्या आधारावर आहेत त्याच्याही पलीकडे एक व्योम म्हणजे चिदाकाश आहे. त्या चिदाकाशात तेजःपुज असा कोणी एक आहे. खरा विचार केला तर ते तेजही नाही व तेजःपुंज ही नाही.

शितळ ही नाही व शांतही नाही कारण तो परमात्मा सर्व धर्म विवर्जित आहे.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते स्थूल सूक्ष्मादि चारी देहांहून विलक्षण असे आहेत. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *