ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.७९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ७९

नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥ नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥

हरिविण जन्म नरकचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणि होय ॥३॥ ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥

अर्थ:-

ज्याच्या जवळ नित्यनेम आहे तो नर दुर्लभ आहे. त्याच्या जवळ लक्ष्मी व तिचा नाथ दोघे ही राहतात. नारायण हरि हा मंत्र जपणाऱ्याच्या घरी भुक्ती मुक्ती दोन्ही हात जोडुन कामारी होतात. हरिनामावीण

असणाऱ्याचे जीवन नरकच असते. व तो प्राणी सहज यमाचा पाहुणा होतो. मी श्री गुरु निवृतिनाथाना विचारले तेंव्हा त्यांनी सांगितले की गगना पेक्षा हरिनाम मोठे आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *