ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.९७

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ९७

अळुमाळु सोय रातलीची धाय । सत्वतेजी माये एकतत्वी ॥ तें तत्वसाधन मुक्तामुक्त धन । कृष्ण नाम

पूर्ण तेजी माये ॥ सोकरी पापपुण्या ठायी आपा । आयुष्याच्या मापा हरि धांवे ॥ ज्ञानदेव गीत गातसे नित्य । कृष्ण कृष्ण सत्य इतुके सार ॥

अर्थ:-

सत्वतेजाची प्राप्ती एकतत्व हरिनामाने हळुवारपणे मनात भक्ती उत्पन्न केल्यावर होते. ते कृष्णनाम हे पुर्ण तेजरुप असुन तत्वसाधन आहे त्यामुळे मुक्त होता येते. ह्या हरिनामाने पापपुण्यांचे पाणी होऊन जाते व

भक्ताच्या उरलेल्या आयुष्याचे रक्षण करण्यासाठी तो हरि स्वतः धावत येतो. तेच कृष्णनाम सत्य व सार असुन त्याचे नित्य गायन केले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇