ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.५९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ५९

चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न भाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥

 अर्थ:-

चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे हे हरिनामाची महती गात आहेत. दह्याचे घुसळण करुन जसे लोणी काढतात तसे ह्यातील हरीनामाचे लोणी काढुन बाकीचा असार कथा भाग सोडुन द्यावा.

जीव व शिवाचे एकच आधिष्ठान हरिनाम आहे. जींवाने उगाच दुर्गम गोष्टीत का मन घालावे. वैकुंठात असलेल्या हरिचा पाठ मी करतो जो सर्वत्र घनदाटपणे वसला आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *