दृष्टांत 29 आसक्तीचा त्याग संसारात का परमार्थात?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

️ #खरामाणुसकोण

एक संत महात्मा नदीच्या पलीकडे रोज जात असे. तिथं त्याचा आश्रम होता.

त्याला एक होडीवाला गरीब माणूस रोज पलीकडे सोडत असे. पण तो संत आहे म्हणून त्या बदल्यात त्यांच्याकडून एक
पैसा सुद्धा घेत नसे.

तसं पाहायला गेलो तर संताजवळ तरी
कुठे पैसा असतो.?

होडीवाला बिचारा साधा सरळ होता.
समज कमी होती. अज्ञानी होता. तो संत रोज जाता येता त्या होडी वाल्या जवळ पारमार्थिक विचार बोलायचं. देवावर चर्चा व्हायची, देवाबद्दल बोलणं व्हायचं. होडीवाला अगदी श्रद्धेने ध्यान देऊन त्या गोष्टी ऐकायचा.

एक दिवस तो संत होडीतून उतरल्यानंतर त्या होडीवाल्याला आपल्या आश्रमात घेऊन गेला आणि म्हणाला.

“बाबा रे मी पूर्वी एक मोठा व्यापारी होतो,
पुष्कळ पैसा कमवला. पण माझ्या वर एक असा प्रसंग आला की, मी माझ्या कुटुंबाला, बायको मुलांना वाचवू शकलो नाही. आता माझे कुटुंबंच राहिले नाही तर हा पैसा माझ्या काय कामाचा. मी सारे सोडले, संन्यासी झालो. पण पैसा मात्र अजून तसाच ठेवला आहे. कोणी योग्य माणूस भेटला तर देणार आहे.”

“तू गरीब आहेस तुला पैशाची गरज आहे, तू हा सगळा पैसा घे, तुझं जीवन श्रीमंत होईल, सुखी होईल त्या तुझ्या कुटुंबाचं
भलं होईल.”

त्यावेळेला त्या गरीब होडी वाल्याने
हात जोडले आणि नम्रपणे म्हणाला.

“नाही महाराज, हा पैसा मी घेऊ शकत नाही, फुकटचा पैसा जर मी घरी घेऊन
गेलो तर आपण सांगितलेला परमार्थाचा
काय उपयोग.?”

“मी हा पैसा घेतला तर माझ्या आचरणात बिघाड होईल. घरातली माणसं आळशी बनतील. कोणीही काम करणार नाही. लालच, आसक्त्ति वाढेल.”

“महाराज आपण मला ईश्वराच्या बाबतीत सांगितलं, ज्ञानेश्वरी सांगितली मला तर आजकल नदीच्या लाटा मधे सुद्धा देव दिसतो. जर तो मला दिसतो, तो मला पहातो, मी त्याला पहातो तर मग मला आणखी काय हवे.?”

“आपणामुळे मला तर खूप मोठे धन मिळाले, मग हे नाशिवंत, दुःख देणारे
धन घेवून मी काय करु?”

“महाराज. मी माझे काम करीत राहीन, आणि बाकी सारे देवावर सोडून आनंदाने नाम घेत जीवन जगत राहीन. मला हा पैसा नको”

गोष्ट संपली पण एक प्रश्न निर्माण झाला.
या दोन माणसा मधील संत कोण आहे.?

एक तो श्रीमंत आहे ज्याने आपल्या वर दुःख आल्या बरोबर भगवे कपडे घातले. संन्यास घेतला, ग्रंथांचा अभ्यास केला आणि दुसऱ्यांना समजावून सांगू लागला. पण तरी सुद्धा पैशाची ममता सोडू शकला नाही.

पैसे देण्यास कोण योग्य आहे अश्या माणसाच्या शोधात राहिला आणि
दुसऱ्या बाजूला तो होडीवाला आहे.
ज्याला सकाळी खायला मिळाले
तर संध्याकाळी मिळेल असे नाही. पण
तरी सुद्धा दुसऱ्याचा पुष्कळ पैसा मिळत
असून सुद्धा त्याचे मन लालचावले नाही,
मोह झाला नाही. भगवे धारण न करता, संन्यास न घेता, संसारात असून सुद्धा, त्या संताचा उपदेश ऐकून, देवावर विश्वास ठेवून, देवाचे नाम घेत जीवन जगणे शिकून, विषयांची आसक्ती न करता, पैशाला ठोकर मारुन, परमार्थ करणारा हा सामान्य गरीब माणूस खरा संत आहे, माणुस आहे.
☘️ साभार ☘️

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 12
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *