ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१५२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १५२

शिवभवानी उपदेशी प्राणप्रिये । निजमानसीं ध्याये परमानंदु पाहे ॥ रामु सखा हरि रामु सखा । रामु सखा हरि रामु सखा ॥ सहस्त्र नामावरी कळसु साजे । तोचि तो अंतरी बाहिजु भीतरीं ॥

हाचि निजधर्म हेंचि निजकर्म । हेंचि परब्रह्म वर्म हेंचि एकु ॥ जिवाचे जीवन मनाचे मोहन । सुखाचे साधन भक्तिज्ञानाचें अंजन ॥ बापरखुमादेविवरु सुलभु साकारु । अर्धमातृका अक्षरु चिदानंदु सुख थोरु ॥

अर्थ:-

महादेव प्राणप्रिय भवानीला उपदेश करतात की त्याचे निजमानसात ध्यान कर त्यात परमानंद आहे. तोच राम व हरि हे सखा आहे हे द्विरुक्तिने सांगतात.हेच रामनाम अनेक सहस्त्र नामांचे हे कळस आहे.तोच राम अंतर बाह्य आहे

त्याचे सतत स्मरण कर. हेच तुझे निजकर्म व निजधर्म आहेत.तेच त्या परब्रह्माचे वर्म आहे.तेच नाम जीवाचे साधन मनाचे मोहन असुन हेच सुखाचे साधन व भक्तीज्ञानाचे अंजन आहे. ॐ ह्या अक्षराची अर्धमात्रा अर्थात परमेश्वर आहे

म्हणुन ते अक्षर चिंदानंद स्वरुप आहे असे तसैच माझे पिता व रखुमाईचे पती सुलभ आहेत असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *