ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१४३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १४३

माझ्या कान्ह्याचे तुम्हीं नांव भरी घ्या वो । हृदयीं धरोनी यासी खेळावया न्या वो ॥ भक्तांकारणें येणे घेतलीसे आळी । दहा गर्भवास सोसी वनमाळी ॥

कल्पनेविरहित भलतया मागे । अभिमान सोडूनी दीनापाठी लागे ॥ शोषिली पूतना येणें मोहिलें लेकरू । आळी न संडी बाप रखुमादेविवरू ॥

अर्थ:-

माझ्या कान्हाचे नांव तुम्ही प्रेमाने घ्या व हृदयाशी कवटाळुन तुम्ही ह्याला खेळावयास घेऊन जा. हा भक्तासाठी मोहित होतो व त्याच्या साठी दहा गर्भवासाचे दुःख ही निमुट भोगतो. त्याला ह्याची आजिबात कल्पना नाही व तो कोणत्याही भक्तासाठी हेच करतो.

स्वतःला आभिमान येऊ न देता कोणत्याही दीन भक्तामागे धावतो. त्या पुतनेने मायेने त्याला मोहित करण्याचा प्रयत्न केला तर ह्यांने तिलाच शोषुन घेतले. असे माझे पिता व रखुमाईचे पती भक्तांचा छंद मात्र टाकुन देत नाही. असे माऊली सांगतात

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *