ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.११२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११२

आरंभी आवडी आदरे आलें नाम । तेणे सकळ सिद्धी जगीं जाले पूर्ण काम ॥ रामकृष्ण गोविंद गोपाळा ।

तूं माय माऊली जीवीं जिव्हाळा ॥ तुझियेनि नामें सकळ संदेहो फिटले । बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥

अर्थ:-

सुरवाती पासुनच आदराने व आवडीने नामस्मरण केल्याने मला सकळ सिध्दी प्राप्त झाल्या व माझी सर्व कामे पुर्णत्वाला गेली. ज्याला रामकृष्ण गोविंद

गोपाळ म्हंटले जातो तो परमात्मा माझ्या जीवाचा जिव्हाळा आहेस नव्हे नव्हे तोच माझी आई आहे. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठलाच्या नामाने माझे सगळे संदेह फिटुन गेले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *