ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.276

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २७६

व्यक्ताचे अव्यक्तीं पाहातां पैं न दिसे । आपींआप रसें व्यक्त हरि । बाहेजु भीतरी आदिमध्य उर्ध्व । हृदयीं सन्निध बिंबलासे ॥ ऐसीये दशे ते अव्यक्त भुंजसी ।

मी माझ्या मोहासी सांडी रया । बापरखुमादेविवर व्यक्त व्यक्ती अव्यक्त । अवघे संचित हरि आहे ॥

अर्थ:-

विचार दृष्टीने पाहिले असता अव्यक्त परमात्म्याच्या ठिकाणी नामरुपात व्यक्त जगत दिसत नाही. तसे पाहिले तर जगत, अधिष्ठान दृष्टीने परमात्मा आहे. तो हरि आत बाहेर, आदि, मध्य आणि हृदयांत व्यापक रूपाने आहे.

व आभास रूपाने हरिच आहे. अशा अव्यक्त हरिला प्राप्त हो. आणि मी व माझे अशा मोहाचा त्याग कर. व्यक्त,अव्यक्त, व्यक्ति, संचित हे सर्व माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल तद्रुपच आहे. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *