ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.308

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३०८

आपणासी आपण उपदेश कीजे । गुरुमुख बुझिजे तेंचि तूं ॥१॥
मी ते कवण हे तूं जाण । बुझे निर्वाण तेंचि तूं ॥२॥
सिद्धचि सांडूनि निघसी अनानी ठायीं । तूं रिघें पां सोई संताचिये ॥३॥
जे तपाव्रताचे ठायीं ते तेथेचि पाहीं । परी ते ठायीच्या ठायी म्हणे ज्ञानदेवो ॥४॥

अर्थ:-

गुरुमुखाने ते ब्रह्म तुं आहेस असे समज असा उपदेश केल्यानंतर आपणच आपणाला उपदेश करावा.तो दृढ निश्चय होण्याकरिता अगोदर तत् त्वम् ‘ पदार्थाचा शोध घ्यावा मी व परमात्मा शोधावा. हा विचार करावयाचे सोडून

मायिक पदार्थाच्या ठिकाणी कशाला हिंडत बसावे ? त्यापेक्षा संताना शरण जाऊन त तपामध्ये व्यापक असलेले ब्रह्मस्वरुप आपल्या ठिकाणी जागचे जागी जसे आहे तसे पाहावे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

अभंग उबलब्ध नाही.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *