ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.304

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३०४

देखणे देखाल तरी हरे मन । सामावले जीवन मुक्तरत्न रया ॥१॥
भला भला तूं भला रे ज्ञाना । निवृत्ति आपणा दावियेले ॥२॥
गुरुमुखें ज्ञान पाविजे निर्वाण । तें निवृत्ति म्हणे ज्ञाना पावशील ॥३॥

अर्थ:-

श्रीनिवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात की “परमात्म्याचे ज्ञान करुन घेशील तर तुझे मन त्या परमात्म्याचे ठिकाणी लयाला जाईल.अशी मनाची स्थिती झाली म्हणजे जीवन मुक्ति हेच रत्न तुझ्या अंतःकरणांत साठविले जाईल.

म्हणून हे ज्ञानदेवा तू फार धन्य धन्य आहेस.” अशा तऱ्हेची माझ्या निवृत्तीरायांनी मजवर कृपा करुन माझे आत्मस्वरुप मला दाविले. दुसरे असे सांगितले की, “हे ज्ञानदेवा तू सद्गुरु मुखाने श्रवण केले असल्यामुळे तुला ज्ञान होऊन मोक्ष प्राप्त होईल” असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

– सौ अंजली भास्कर ओक,बदलापूर.

Dnyaneshwar Mauli is telling us that his Satguru and elderly Brother Shri Nivrutti Nath guided that,

” If you get known about Parmatma, your mind will get dissolved at him. If your mind achieve this state, a gem of liberation will be stored in your

conscience. You are blessed.” Like this Nivrutti Ray graced me and shown my self- esteem (Atma Swaroop). Secondly he said, ” You have heard this from Guru’s mouth, so you will have intelligence

(Dnyan) and will get salvation”.

– Mrs Anjali Bhaskar Oak, Badlapur.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *