ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.162

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-६ वे, उपासना अभंग १६२

स्वप्नींचे सुख मी पहावया गेलें । तंव स्वप्नी स्वप्न ठेलें येरा विस्मो गे माये ॥ काय सांगो निदसुरी कवळले संसारी । करिता येरझारी येणेंचि छंदे ॥

सुषुप्तींचे सुखजागृती जाणती । तरी परतोनी मागुती कासया येती ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु राणे रावो । ऐसा जाणोनी तयाचा भावो ठाकियेला ॥

 अर्थ:-
स्वप्नाचे सुख मी पाहावयास गेले तेंव्हा ते मलाच कळले. व इतरांना ते न समजल्यामुळे विस्मय वाटला. त्या स्वप्न संसारात मी गाढ निजले व जन्ममृत्युच्या येरझाऱ्यात अडकले. सुषुप्ती अवस्थेत त्या परमात्म सुखाचे भोगणे होताना

ते जागृत अवस्थेत भौतिकात मिळणार नाही मग तिकडे परत कोण जाईल? माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हेच त्या नित्यसुखाचे उदार राजे आहेत अशा भावाने त्यांना मी जाणुन घेतले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *