ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.४७

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ४७

स्वर्ग जयाची साळोंखा । समुद्र पाळी पिंड देखा । शेषासारिखी बैसका । जो आधार तिहीं लोकां ॥ लिंग देखिले देखिले । त्रिभुवनी विस्तारले ॥ मेघधारी स्नपन केलें । तारापुष्पी वरी पूजिले ।

चंद्रफळ ज्या वाहिले । ओवाळिलें रविदीपे ॥ आत्म नैवेद्य समर्पिले । ब्रह्मानंदी मग वंदिले । जोतिर्लिंग मग ध्याईले । ज्ञानदेवी हृदयी ॥

अर्थ:-
ज्याची साळुंखा स्वर्गाला भिडली आहे. व खालच्या पिंडीने समुद्राचा ठाव घेतला आहे. जो शेषासारखी बैठक करुन बसला आहे. तो ह्या तिन्ही लोकांचा आधार आहे. असे परमात्मतत्व लिंग स्वरुपात मी पाहिले व ते त्रिभुवनात विस्तारलेले आहे.

त्याचे स्नान मेघधारा घडवतात. त्याची पुजा तारापुष्प अर्पून होते. त्याला चंद्राचा फळ म्हणूुन नैवेद्य दाखवतात व सुर्याला घेऊन त्याचे औक्षण करतात. त्याला आत्मनैवेद्य लागतो. ब्रह्मानंदी मन त्याला अर्पण करावे लागते. असे जोर्तिलिंग माऊली ज्ञानेश्वर आपल्या हृदयात ध्यात आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *