ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.३२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३२

नीळवर्ण रजे नीळवर्ण बुझे । निळीमा सहजे आकारली ॥ नीलप्रभा दिसे नीळपणे वसे । निळिया आकाशे हारपले ॥ निळेपण ठेलें निळिये गोविलें ।

निळेपण सोविळें आम्हां झालें ॥ ज्ञानदेवीं निळा परब्रह्मी गोंवला । कृष्णमूर्ति सावळा हृदयी वसे ॥

अर्थ:-

त्या घननिळ्याच्या पायीच्या धुळी मनालाही निळेपण लाभले आहे.व ती सहज मनात आकारली. त्याचा निळा रंग असल्याने त्याची निलप्रभा पसरली आहे.व त्यात आकाश हारपले आहे. त्या देवाच्या

निलवर्णामुळे भक्त ही निळेपणात न्हाले व त्यामुळे ते पवित्र झाले. मी त्याला परब्रह्मात ही निळेपणे पाहिला व ती कृष्णमूर्ती सावळेपणेच हृदयात वसली असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *