ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.३३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३३

निळिये पेरणी निळियेपणी खाणीं । गुणाची लेणी कृष्णवर्ण ॥ नवलाव गे माय नवल चोज । निळीं निळिमा काज आकारलें ॥

नीळवर्ण तनु नीळवर्ण गुणू । निळी निळिमा पूर्ण हृदयी नांदे ॥ ज्ञानदेवीं लीला मन मनी निवाला । निळिये अवलीला हरपला ॥

अर्थ:-

त्या हृदयात निळेपणाचा परमात्मरुपी बीज घातल्यावर निळवर्णाची खाणच मिळाली. त्या निलवर्णाने सर्व गुण निळेच झाले आहेत. आश्चर्य आहे की माया ही निळीच आहे. व सर्व जगच निळे दिसत आहे.

त्याचे शरिर निळे त्याचे गुण निळे संपुर्ण हृदयी निळेपणे आले आहे. त्याच्या निळवर्ण लीलेने मन उन्मन झाले व मी त्यात लीन झालो. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *