ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.९०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ९०

प्राप्तीवीण फळ केवीं लाहेप्राणी । जैसा चातक धरणी उपवासु ॥ ओळलिया मेघु सावधु बोभाये । बिंदुमात्र घेई जीवन देखा ॥

तैसें केवीं घडे संसारिया चित्ते । प्राप्तीच्या अर्थाते साहें संत ॥ सगुण निर्गुण समरस आहे । विरुळा येथ साहें समता बुद्धी ॥ जंववरी समान शांती बुद्धी हे ठेली । तंववरी ये भुली बोली कैसी घडे ॥

दिन काळ पळपळ स्मरण नामाचे । विरुळा या मंत्राचे करी पठण । ज्ञानदेव म्हणे नामया हे तूं गा जाणसी । भजन केशवांसी तूंचि तुझा ॥

अर्थ:-

पावसाचे पाणी वरच्यावर चोचीत घेऊन चातक आपली तहान भागवतो. तदवत नामाची प्राप्ती करुन घेतल्या शिवाय फळ कसे मिळेल. जेंव्हा तो मेघ वृष्टी करण्यासाठी परततो तेंव्हा तो चातक सावध होऊन त्याची वाट पाहात बसतो. त्या प्रमाणे संसाराच्या तापातुन

वाचण्यासाठी संतांकडुन नाममहावाक्य मिळावे ह्या साठी जीव कसा व कधी सावध होणार? सगुण व निर्गुण रुपाने तो परमात्मा सर्वत्र आहे पण त्याला पाहायला ही समता बुध्दीनेच पाहता येते. जो पर्यंत ही समता बुध्दी मिळत नाही. तो पर्यंत त्याची संसारावरची बुध्दी व

भुल कशी उतरेल. नित्यनेमाने रांत्रंदिवस नामाचे चिंतन करणारा जीव विरळ आहे. असे नामभजन करण्याचे नामदेवराय जाणतात म्हणुन तुम्ही सतत भजन करत असता असे ज्ञान माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *