संत चोखामेळा म. चरित्र ६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा भाग  –  ६.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

वारकरी आणि चोखोबा एका झाडाखाली बसल्यावर,त्या वारकर्‍याने भागवत धर्माची,ज्ञानेश्वरांची व त्यांनी खास उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवुन या धर्माचा मोठ्या प्रमाणावर पुनरुध्दार केला. ते स्वतः ब्राम्हण असुनही सर्व जाती धर्माच्या लोकांना उराशी घेतले,हे ऐकुन चोखा आश्चर्याने थक्क झाले, कारण ब्राम्हणांबद्दलचा त्यांना आलेला अनुभव फार विचित्र होता.सावलीही न पडु देणारे,चुकुन पडलीच तर, कुत्र्या सारखे हाडss हाडss करणारे भट ब्राम्हण पाहिले होते,अनुभवले होते. त्यांनी भित भित वारकर्‍याला विचारले, मला ज्ञानोबा माऊली भेटतील का?प्रसन्न हसत म्हणाला,सध्या त्यांचा मुक्काम पंढरपूरलाच आहे.सोबत त्यांची भावंडे, निवृत्तीनाथ,सोपान आणि मुक्ताई पण आहेत.तसेच शिंपी जातीचा नामदेवही  तिथेच  आहे.हे ऐकुन वारकर्‍याला वंदन करुन झपाट्याने निघाले.मनाची अधिरता त्यांच्या देहबोलीतुन स्पष्ट होत होती.चालता चालतां चोखोंच्या मनांत अनेक विचारांची आवर्तने उठत होती.

त्यांना हे सर्व अशक्य वाटत होते. गोंधळलेल्या मनःस्थितीतच ते पंढरपूरला पोहोचले.तिथेही आधीचेच दृष्य सर्रास दिसत होते.जाती धर्माचा भेदभाव दिसत नव्हता. तिथे त्यांना एक विलक्षण दृष्य दिसले.एक यवन वारकरी नमाज पढतांना बघुन चोखा थक्क झाले.एक यवन आणि वारकरी? तोही विठ्ठलाच्या दर्शनाला?त्यांनी कुतुहलापोटी त्याचा नमाज झाल्यावर त्याच्या जवळ गेल्यावर कांही विचारायच्या आंतच त्या यवनाने चोखांच्या पायावर डोके ठेवले व ह्रदयाशी धरुन मिठी मारली.चोखाच्या डोळ्यातील आश्चर्य पाहुन यवनच म्हणाला,मी मुसलमान असुन,या देवाच्या वारीला कसा जातो? मग ऐक!अरे! या पंढरीचा महिमाच असा आहे की,जात धर्म,पंथ सर्व गळुन पडतात.या पंढरीचं, पंढरीच्या विठोबाचं महात्म्यच तसं आहे. याचं वर्णन ज्ञानेश्वर,नामदेव आपल्या भजन किर्तनातुन करतात तेव्हा भारावुन इथे येतच राहावेसे वाटते.हा अनुभव तुला येईलच.

आतां मात्र त्याची उत्सुकता शिगेला पोहचली.सर्वात जास्त त्या तरुण शिंपी नामदेव तरुणाला भेटण्याची.अश्या उत्सुकतेची अनेक कवाडे घेऊन पंढरपूर च्या वेशीवर पोहोचले.मधे चंद्रभागा नदी, तिथली गर्दी पाहुन त्यांना डुबकी निदान हातपाय तरी धुवावेसे वाटले,पण धाडस झाले नाही.उन्हात चंद्रभागेचे पाणी चमकत होते,तसे मंदीराचा कळसही चमकत होता.चोखोबांचे समाधानाने डोळे भरुन आले.मिटल्या डोळ्यांतुन अश्रू ओघळले.मनःचक्षूसमोर कर कटेवर विटेवर उभी असलेली विठ्ठलाची सावळी मूर्ती साकार झाली जणुं त्यांची समाधी लागली हे पाहुन एक विठ्ठलभक्त त्यांच्या पायाशी वाकलेला पाहुन चोखा एकदम घाबरुन, अरे बाबा काय करतोस?मी क्षुद्र  हे ऐकल्यावर त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर एकदम ओळख पटुन म्हणाला,म्हणजे तू चोखामेळाच ना?चोखा आश्चर्याने म्हणाले,तुला माझे नांव कसे कळले. विठ्ठलानं!त्या पांडुरंगाने सांगीतले.त्याने चोखांच्या खांद्यावर हात ठेवुन म्हणाले, अरे चोखोबा,मी नामदेव…नामदेव शिंपी!

नामदेव? ज्ञानोबा माऊलीचा सखा.. साक्षात आपल्या खांद्यावर हात ठेवुन उभा…अंतरात्म्याची ओळख पटली. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पांडुरंग भेटल्याचा आनंद चोखाला झाला.दुसर्‍याच क्षणी चोखोनं नामदेवांच्या पायावर लोटांगण घातले.डोळ्यातील अश्रूंनी त्यांच्या पाया वर अभिषेक केला.देवा,नामदेवाss नामयाss चोखांची भारावलेली स्थिती पाहुन नामदेवांनी त्यांना ह्रदयाशी धरले. नामदेव चोखांची भेट अपूर्व होती,कवति काची होती.चोखांच्या दृष्टीने ही घटना विलक्षण होती.त्यांच्या आयुष्याला विलक्षण कलाटणी मिळणार होती.हा अपूर्व भेटीचा सोहळा बघुन विटे वर उभ्या असलेल्या विठ्ठलाला अतिशय आनंद झाला.चोखामेळा त्याच्या परिवारा त सामील होण्यासाठी त्या दोघांची भेट  आवश्यक होती.कालच नामदेवांशी विठ्ठलाचे बोलणे झाले होते.म्हणुनच काल विठ्ठलाने वृध्द वारकर्‍याच्या रुपात धर्मनिरपेक्षतेची अर्धवट माहिती सांगुन चोखाची उत्कट भक्ती आणि नामदेव-ज्ञानश्वरांची नांवे सांगुन अपार उत्सुकता जागवुन नामदेवाची भेट घडवली.चोखांच्या आयुष्याचा इवलासा प्रवाह आतां भक्तीगंगेत मिसळणार होता.दोघांच्या भेटीचा अपूर्व भेटसोहळा डोळे भरुन,भान हरपुन विठ्ठल पाहत होता.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *