ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. ३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

🚩 अभंग३ 🚩
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३

सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावण्य!नाही रूप वर्ण गुण तेथे!!
तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी!पाहता पाहणेश्वरी सारोनिया!!
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती !ति ही मुर्ती उभी विटेवरी!!

        अर्थ

सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावण्य ! नाही रुप वर्ण गुण तेथे !!

करुणावरुणालय श्रीपंढरीशपांडुरंगाचे हरि ज्ञान अनंत आहे.पंचतत्त्वे व्यापक असूनही ते रुपातीत,गुणातीत,वर्णातीत आहे.

बाबारे ! हे सत्य आहे कि पंढरपूर निवासीनी वैकुंठवासीनी विठाबाई हिच्या रूपाचे वर्णन गगना पेक्षाही  जास्त श्रेष्ठ  आहे. विठेवरी ज्यांची पाऊले समान तोची एक दान शुरदाता!!…

सुंदर ते ध्यान उभा विठेवरी कर कटावरी ठेऊनिया …..असा हा भक्तीचा महामेरू विठ्ठल आहे! विठ्ठल  आवडी प्रेम भाव! तुझ्या नामाचा हो टाहो!!… समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो….. किती वर्णन करावे तेवढे थोडेच आहे !  देवाची करणी नारळात पाणी असे म्हंटले जाते !

तसे आमच्या भगवंताचे  ज्ञान गगनाहूनी वाड आहे. म्हणून तर संत मंडळी कशाचीही  अपेक्षा न करता विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊनीया नाचतात. खेळ मांडीयेला वाळवंटी नाचती वैष्णव भाई रे!!…. असा कसा देवाचा देव सर्वांना भक्तीचे वेढ लावियला लळा !!

म्हणून अभंगाचे दुसर्‍या चरणात माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ,

तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी ! पाहता पाहणेश्वरी  सारोनिया!!

विठू तुझे माझे राज्य नाही दुसर्‍याचे काज !!….पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीयेला डोळा बाई ये हो….. वेधले हो मन त्याची ये गोडी!!….. आपले या जगात परब्रह्म शिवाय कोणी नाही. म्हणून माऊलीने सांगितले , योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा!!….

ज्ञानीयाचा राजा गुरू महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे …..योग्याची माऊली वैष्णवाचे अग्रगण्य असलेल्या माऊलीला सुध्दा विठ्ठल  भक्ती आवडली! म्हणून तर माऊली म्हणतात, आजी संसार सुफल झाला गे माये देखियेले पाय विठोबाचे!!…

तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा …… पांडूरंग अनंत रूपे अनंत वेषे देखीले म्या त्याशी बापरखुमादेवीवरू खुण बांधली कैशी !!…असा हा गुणात्मक विठ्ठल त्यांची भक्तीची गुढी पंढरपूरला नाचत जाऊ !! त्याच्या गावा खेळीया सुख देईल विसावा रे….. तो सगळे सुख समाधान प्राप्त करून देणारा , आपल्यावरील सर्व संकटे दूर करणारा तुच भगवंत श्रीरंग आहेस!! तुला काय सांगण्यची गरज नाही . सर्व तीर्थाचे माहेर घर पंढरी मध्ये विराजमान आहे. वैकुंठ नायकाची सेवा करत राहिले पाहिजे. कारण हेच सर्व सुखाची गोडी चाखणयाचा मार्ग आहे. नरदेहा येऊन करावे भजन कीर्तन !!

म्हणून अभंगाचे शेवटच्या चरणात माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज  म्हणतात ,

 ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती ! ति ही मुर्ती उभी विठेवरी!!

जसा दिपक ज्योत उजेड देतो तसाच आमचा कैवारी प्राणविसावा मेघशामा श्रीहरी त्याचे नामस्मरण सर्व श्रेष्ठ मानले ! अखंड जया तुझी प्रिती! मज दे तयाची संगती!! मग मी!! कमलापती !तुज बा नाणी कंटाळा!!….. पडोनि राहिन तये ठायी! उगाची संताचिये पायी! न मागे न करी काही!!…… तुझी आण गा विठोबा…… तुम्ही आम्ही पीडो जेणे दोन्ही वारती एकाने बैसलो धरणे…… हाका देत दाराशी……. तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला ….. .न पाहिजे केला अवघा माझा अव्हेर ……अशी ही महान विभुति पुण्य पावन तीर्थक्षेत्र पंढरी मध्ये

विराजमान असलेल्या योगीराज योगेश्वरी सह वैष्णव धर्माची पताका घेऊन लाखो वैष्णवाचा मेला जमा झाले आहे . जगाच्या पाठीवर कुठेही असा कमरेवर हात ठेवून निरंतर आम्हा लेकरांना दर्शन देत उभा राहिला आहे ! अशी हि ज्योतीची निज ज्योती  जगजेठी श्रीपंढरीश पांडूरंग श्रीरंग विठ्ठल त्यांची भक्तीची ओढ मनाला लागली कि तो भक्ताचे संकटसमई धाऊन येतो म्हणून माऊली सांगतात!!

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *