संत चोखामेळा म. चरित्र ८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  ८.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबाच्या विधिलिखितामुळे व गुरुआज्ञेने कां होईना,नामदेव निमित्य मात्र होणार होते.भागवत धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी सारं आयुष्य ते वेचणार होते.समाजाच्या तळागळातील जाती जमातीपर्यंत हा प्रचार पोहोचावाय चा होता.जेवढ्या ऊत्सुकतेने चोखोबा भागवत धर्माची माहिती जाणुन घेण्यास उत्सुक होते,तेवढेच उतावीळ ज्ञान देण्यास नामदेव ऊत्सुक होते. विठाई आणि ज्ञानदेव माऊलीच्या आज्ञेने  तुमच्या सर्व शंकांचे निरसन करायचा प्रयत्न करतो.नामदेवांनी बोलायला सुरुवात केली.सारी चराचर सृष्टी,सारं तेज कानांत प्राण आणुन ऐकत होते.चोखोबांचे सर्व इंद्रीयांनाच जणुं कान फुटले होते.नामदेवांच्या मुखातुन पडणार्‍या ज्ञानामृतधारा प्राशन करण्यासाठी चोखोबाच्या मनांत भरलेला अंधःकारता प्रकाशात बदलण्यासाठी ते तयार होऊन बसले.

चोखोबा! सगळ्या विठ्ठल भक्तांनी वारकर्‍यांनी आपलासा केलेला भागवत धर्म सर्वश्रेष्ठ भक्त पुंडलिकाने सुस्थापित केला.पुंडलिकाची विठ्ठलावर जेवढी भक्ती होती.तेवढाच त्याचा अधिकार मोठा होता.म्हणुनच आई वडिलांच्या सेवेत गुंतलेल्या पुंडलिकाला भेटायला विठ्ठल स्वतः जेव्हा त्याच्या घरी गेला, तेव्हा एक वीट विठ्ठलाकडे फेकुन त्यावर वाट धघत उभं राहायला सांगीतले.आणि आजतागायत भक्तासाठी तसाच विटेवर उभा आहे.विठ्ठलभक्तांवर केलेला मोठा उपकार तर आहेच,पण त्याच बरोबर भागवतधर्मासारखा सर्व समावेशक,सर्व व्यापक धर्म संस्थापित करुन पुंडलिकाने सार्‍या मानव जातीवर उपकार केलेले आहे.हीच विशाल दृष्टी बाळगुन ज्ञानेश्वरां नी या भागवत धर्माचे पुनरुज्जीवन केले. चोखोबा!चंद्रभागेच्या वाळवंटात भागवत धर्माच्या झेंड्याखाली आध्यात्मिक लोक शाहीचं राज्य उदयास आलं.या राज्यातल्या भक्तीच्या पेठेत विठ्ठलनामाचे अमाप पिक येत आहे.चोखोबा!पंढरी हे या भूलोकीचं पृथ्वीतलावरील वैकुंठ आहे तर विठूराया या वैकुंठीचा राणा आहे. भक्तीचा भूकेला,तहानलेला सर्वाच्यांत वसलेला आहे.म्हणजे माझ्यातसुध्दा!होय चोखोबा होय!तुमच्या माझ्यात अगदी चरांचरात वसलेला आहे हेच भागवतधर्म सांगतो,हेच भागवतधर्माचे तत्व आहे. मग चोखोबाच्या मनांत नवा प्रश्न उद्भवला.एकमेकांची उरभेट कां घेतात? चोखोबा!विठ्ठल सर्वांच्या ह्रदयात असल्याने आपण सर्व एकाच पातळीवर येतो.म्हणुन एकमेकांच्या ह्रदयांत वसले ल्या परमेश्वराला भेटण्यासाठी ऊराउरी भेटतात,एकमेकांच्या पायावर डोकं टेकवुन परमेश्वराला नमस्कार करतात. त्यावेळी त्यांची एकच जात,एकच धर्म असतो,भागवतधर्म!नामया! तुमचं बोलणं ऐकुन प्रत्यक्ष विठुरायाशीच बोलतोय असा भास झाला.

चोखोबा!भागवतधर्माची,वारकरी संप्रदायाची एक वेगळीच परंपरा आहे. वेद प्रामाण्य,भक्ती प्रामाण्य अशा या भागवत धर्मात विठ्ठल धर्माची मिरासदारी नामाचा महिमा हे मूलतत्व,आत्मा हाच ईश्वर!आणि ईश्वर म्हणजेच आत्मा सांगणारा अद्वैतवाद याचं प्रमाण असुन, महत्वाचं म्हणजे धर्म जाती निरपेक्ष अध्यात्मदृष्टी याची मूळ संकल्पना आहे. सामाजिक समतेची ग्वाही हे या संप्रदाया चं वचन आहे. वारकर्‍यांचा हा विठ्ठल देव सखा,माऊली व पिताही आहे,ही पंढरी वारकर्‍यांचं माहेरघर आहे आणि म्हणुन “रामकृष्णहरी” हा या संप्रदायाचा महामंत्र उद् घोष आहे. “अंतरी निर्मळ,वाचेचा रसाळ।त्याच्या गळा माळ असो नसो।” अशा कुणालाही सामावुन घेण्याची विशालता या भागवत धर्मात आहे.

चोखोबा!तुम्ही वारकरी आहांत, विठ्ठलभक्त आहांत.आजपासुन अगदी या क्षणापासुन तुम्ही भागवत धर्माचे झालात.ती विठ्ठलमाऊली आपणांसर्वांची आई आहे.आपण जातीहिन,समाजा कडुन उपेक्षेलेले आहोत असं कधीही वाटलं की,या चंद्रभागेच्या वाळवंटात या! इथे तुम्हाला भक्तीचा,जाती धर्माच्या पलि कडे असलेला निर्मळ झरा सांपडेल,त्यात तहान भागवा.त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा.आणि पुन्हा आपल्या गांवाला जा! नामदेवांच्या आमंत्रणाने चोखोबा गहिवरले.भावविवश होऊन त्यांच्या मिठीत शिरले.आईच्या कुशीत शिरल्याची जाणीव झाली. नामदेवा! मी भागवत धर्मात आलो तर,विठ्ठलाचे दर्शन घेतां येईल? मला.. मला.. पांडुरंगाच्या देवळांत प्रवेश मिळेल आसुसल्या नजरेने ते नामदेवांच्या उत्तराची वाट बघत होते.एक क्षण..एकच क्षण नामदेवांचा चेहरा उतरला.विलक्षण खंत,घायाळ भाव उमटले,पण दुसर्‍याच क्षणी स्वतःला सावरुन…..

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *