ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१५०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १५०

गाते श्रोते आणि पाहाते । चतुर विनोदी दुश्चिते ॥ सोहंभावी पूर्ण ज्ञाते । या सकळांते विनवणी ॥ करा विठ्ठल स्मरण । नामरुपीं अनुसंधान । जाणोनि भक्तां भवलक्षण । जघनप्रमाण दावितो ॥ पुंडलिकाच्या भावर्था ।

गोकुळींहुनि जाला येता । निजप्रेम भक्ति भक्तां । घ्या घ्या आतां म्हणतसे ॥ मी माझें आणि तुझें । न धरीं टाकीं परतें ओझें । भावबळें फळती बीजें । बापरखुमादेविवरु विठ्ठलीं ॥

अर्थ:-

गाणारे, श्रोते, आणि पाहणारे चतुर, विनोदी व सोहंभावामुळे झालेली ज्ञानी या सगळ्यांना विनंती करतो. तुम्ही सर्व विठ्ठल स्मरण करा. आपले अनुसंधान त्या नामाशी जोडा. हे भक्तांनो हा भवसागर त्या श्री विठ्ठलाच्या कमरे येवढा आहे

हे तो कमरेवर हात ठेऊन दाखवतो.तो पुंडलिकाच्या भावाने गोकुळीहुन आला आहे व ते निजप्रेम सर्व भक्तांना घ्या घ्या म्हणतो. मी, माझे व तुझे हे ओझे टाकुन द्या माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल ह्यांचा चरणी तो भाव ठेवा असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *