👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
तुज सगुण म्हणो कीं निर्गुण रे ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५
तुज सगुण म्हणो कीं निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥ अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥ तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे । स्थूळ सूक्ष्म एक गोविंदु रे ॥३॥ तुज आकारू म्हणो की निराकारू रे । आकारू निराकारू एकु गोविंदु रे ॥४॥ तुज दृश्य म्हणो की अदृश्य रे । दृश्य अदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥ निवृत्तीप्रसादे ज्ञानदेव बोले । बापरखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥६॥
अर्थ:-
हे गोविंदा तुला सगुण म्हणायचे की निर्गुण म्हणायचे मला तु दोन्ही ही वाटतोस. तुझा अनुमान करता येत नाही श्रुती ही नेती नेती म्हणुन थांबते व तुलाच दाखवते. तुला स्थुळ म्हणायचे की सुक्ष्म म्हणायचे तु मला दोन्ही रुपात दिसतोस. तुला आकारलेला मानायचे की निराकार मानायचे तु दोन्ही पध्दतीने मला दिसतोस. तुला दृष्य म्हणायचे की अदृश्य म्हणायचे तु दृष्य होऊन दिसतोस व अदृश्यरुपी जाणवतोस.निवृत्तिनाथांच्या कृपेने मी तुला विठ्ठल म्हणुनच पाहतो व अनुभवतो असे माऊली सांगतात.
ईतर लेख, गोसावी-बैरागी-संन्यासी\, ग्रंथाचे प्रश्नोत्तरे, ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानेश्वरी पारायण प्रत, प्रश्नोत्तर सूची, वैदिक-हिंदू संस्कृती, संत ज्ञानेश्वर चरित्र, संत ज्ञानेश्वर म. संपूर्ण चरित्र सूची, संत ज्ञानेश्वर संपूर्ण, संत तुकाराम संपूर्ण, संत नामदेव संपूर्ण, संत समाधी अभंग, संत सोपान काका संपूर्ण, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सूची
आरोग्य, आहार भोजन, गीता संहिता व्हिडिओ, ग्रंथाचे प्रश्नोत्तरे, ज्ञानेश्वरी पारायण प्रत, पाप कर्म कोणते, प्रश्नोत्तर सूची, भोजन संपूर्ण, वैदिक-हिंदू संस्कृती, शास्त्र असे सांगते, संत ज्ञानेश्वर संपूर्ण
आरोग्य, आहार भोजन, ग्रंथाचे प्रश्नोत्तरे, ज्ञानेश्वरी पारायण प्रत, धार्मिक, पाप कर्म कोणते, प्रश्नोत्तर सूची, भोजन संपूर्ण, शास्त्र असे सांगते, संत ज्ञानेश्वर संपूर्ण, सांप्रदाय परिचय, सांप्रदायिक नित्यनेम, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सूची
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानेश्वरी पारायण प्रत, पदयात्रा चारधाम वर्णन, वारकरी वैभव, वारी, वैदिक-हिंदू संस्कृती, संत ज्ञानेश्वर चरित्र, संत ज्ञानेश्वर म. संपूर्ण चरित्र सूची, संत ज्ञानेश्वर संपूर्ण, सांप्रदाय परिचय, सांप्रदायिक नित्यनेम
ग्रंथ, ज्ञानेश्वरी पारायण प्रत, मराठी ग्रंथ, वारकरी ग्रंथ, संत ज्ञानेश्वर संपूर्ण, संस्कृत ग्रंथ, संस्कृत मराठी ग्रंथ, सार्थ ग्रंथ, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सूची
✔ही माहिती ईतरांनाही पाठवा⬇
Related1