ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.240

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २४०

निर्जीव दगडांची काय करिसी सेवा । तो तुज निर्देवा देईल काय ॥ कवणे गुणें भुली पडली गव्हारा । तीर्थाच्या माहेरा नोळखिसी ॥

अष्ठोत्तरशें तीर्थे जयाच्या चरणीं । तो तुझ्या हृदयभुवनी आत्मारामु ॥ देव जवळी असतां जासी आना तीर्था । मुकलासी आता म्हणे ज्ञानदेवो ॥

अर्थ:-

अरे वेड्या हृदयरुपी मंदिरात परमात्मा वास करीत असताना त्याला विसरुन हा दगडच देव आहे. अशा निश्चयाने त्याची सेवा काय करीत बसला आहेस.परमात्म ज्ञानाचा विचार न करता तू जर देहच मी आहे

असे मानू लागला तर निर्दैवी असलेल्या तुला दगड काय देणार. तुला काय भूल पडली हे काही कळत नाही. मुख तीर्थाचि माहेर असलेला जो परमात्मा त्याला तुं का ओळखत नाहीस.

एकशे आठ तीर्थ ज्याच्या चरणा जवळ आहेत असा परमात्मा तुझ्या हृदयातच आहे. असा जवळच परमात्मा असताना तु उगाच तीर्थभ्रमण करत राहिलास तर तु त्याला मुकशील असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *