ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.221

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २२१ 

संसारयात्रा भरली थोर । अहंभावे चळे हाट बाजार । कामक्रोध विके मद मत्सर । धर्म लोपें अधर्मे वेव्हार ॥ यात्रा भरली जनी देवीं विन्मुख प्राणी ।

विषयाची दाटणी भ्रांती आड रे ॥ एकी मीपणाच्या मांडिल्या मोटा । अहं भावाच्या गोणिया सांडिल्या चोहटा । एकी गाढवावरी भरली प्रतिष्ठा ।

तऱ्ही तृप्ति नव्हे दुर्भरा पोटा ॥ एक पंडितपण मिरविती श्रेष्ठ । एक ज्ञान विकुनी भरिती पोट । हिंसेलागी वेद करिताती पाठ । चौरयांशी जीवा भोंवतसे आट ॥

अज्ञान भ्रांतीची भरली पोतीं । सुवस्तु सांडुनि कुवस्तु घेती ॥ सुखाचेनि चाडें सुखाची प्रीतीं । अमृत सांडुनी विष सेविती ॥ शांती क्षमा दया न धरवे चित्ती ।

विषयावरी थोर वाढविली भक्ति ॥ जवळी देवो आणि दाहि दिशा हिंडती । स्वधर्म सांडुनी परधर्मी रती ॥ ऐसे जन विगुंतले ठायी ।

आत्महिताची शुध्दीचि नाही । नाशिवंत देह मानिला जिहीं तया । तृप्ती जाली मृगजल डोहीं रया ॥ श्रीगुरु निवृत्तिने नवल केलें ।

देखणेचि अदेखणें करुनी दाविले । मी माझी देवो याने विश्व व्यापिलें । बापरखुमादेविवरें विठ्ठलें रया ॥

अर्थ:-

संसार यात्रेमध्ये अहंम भावाचा बाजार भरला आहे. तेथे काम,क्रोध मद मत्सर विकला जातो व धर्म लोप पावून अधर्माचा व्यवहार होतो. यात्रेमधील विषयाच्या भांरच्या आड जीव

आत्मरुपाला विन्मुख झाला. त्या यात्रेत काहीनी मी पणाच्या मोटा मांडल्या व अंहभांवाच्या गोण्या सोडल्या. एकाने गाढवावर प्रतिष्ठा भरली तरी पोटाला तृप्ती झाली नाही.

तिथे एकानी श्रेष्ठ पंडीतपण मिरवले तर एकाने ज्ञान विकुन पोट भरल. काहीनी हिंसेकरता वेदपाठ केले ते चौऱ्यांशी लक्ष योनीत अडकले. काहींनी अज्ञान व भ्रांतीतर ची पोटे भरली तर

काहींनी चांगली वस्तू सोडून वाईट वस्तू घेतली. काहीनी सुखा साठी सुखरुप नामामृत सोडले व विषयातील विष घेतले. काहीना शांती क्षमा दया ही चित्तात धरता आली नाही.

व त्यांनी विषयावर भक्ती वाढवली. स्वतःत असणारा आत्मरुप परामात्मा सोडुन काही दहादिशांना शोधायला गेले तर काहीनी स्वर्म सोडुन परधर्म पत्करला.

असे हे जन ठायीच गुंतले व त्यांना आत्महिताची शुध्दी राहिली नाही. ज्यांनी नाशिवंत देहाला मानले त्यांना मृगजळ पिऊन तृप्ती झाली. माझे श्रीगुरु निवृत्तिनी नवल केले त्यांनी दृष्य

अदृष्य करुन टाकले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी माझे आत्मरुप दाखवुन त्या परमात्म्याने विश्व व्यापले आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *