ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.206

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २०६

स्वप्नींचेनि सुखे मानिताती सुख । घेतलीया विख जाईल देह ॥ मोलाचे आयुष्य दवडितोसी वाया । माध्यान्हींची छाया जाय वेगीं ॥

वेग करी भजनां काळ यम श्रेष्ठ । कैसेन वैकुंठ पावशील झणीं । बापरखुमादेविवरू विठ्ठल उभा । सर्वत्र घटीं प्रभा त्याची आहे ॥

अर्थ:-

स्वप्नातील सुखीला सुख मानणे मिथ्या आहे ते सुख नसुन विष आहे ते घेतले तर देह जाईल मोलाचे आयुष्य का वाया दवडत आहेस. ज्याप्रमाणे माध्यानकाळची छाया आपलीचअसते.

पण ती एका क्षणात जाते. म्हणून तू हरीभजनाचा वेग कर कारण काळ मागे लागला आहे मग वैकुंठ कसे प्राप्त करशिल. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठोबाराय भक्ताकरिता विटेवर उभे आहेत व त्याचेच ज्ञान सर्व जीवांच्या बुद्धीत आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *