ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.181

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १८१

मदनमूर्ति तूं डोळ्यां । आसुमाय जालासी । सेखीं कामिनीचेनि पक्षे । ती पुराणं पिशाच करिती रया ॥ गोजिरिया गुण निधाना । बापा गुंतल्यापणाचिया साठीं । वेद विदेही विचारितां तेथें । आगम काढिती आटी रया ॥थ्रु ॥ सायुज्यता जालीया

। मग सादृश्यपण तेथें लोपे । अवयव अळंकार मुरालिया । तेथें दृष्टि परमार्थ थोपे रया ॥ तत्त्वपणाचेनि समरसें । तेथें पुरोनी उरे ते शेष ॥ रखुमादेविवरु विठ्ठल । गगनीं नक्षत्र पडे नुरेचि तेथ रेख रया ॥

अर्थ:-
हे श्रीकष्णा तुम्ही प्रत्यक्ष मदनच आहात.ते डोळ्याची तृप्ती न करणारे रुप आहे त्याला उपमा देण्सास सुंदर स्त्रीचे रुपक वेदांनी वापरले तरी ते वेडे ठरले. ह्या गोजिऱ्या रुपावर गोपी मोहित झाल्या व विदेहाला पोहचल्या त्याचा विचार करणे

वेदांनाही जमले नाही. अशारितीने गोपी व त्याची सायुज्यता झाली.तेथे दृष्यपण संपले जसे सोने अलंकारात लुप्त झाले.तेथे फक्त परमार्थ राहिला. जसे तत्वपणाचे सामरस्य होते तेथे सगळे जाऊन तो एकटा उरतो. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल, हे सर्व नक्षत्र तारांगणात लोप पाऊन एकटे उरतात असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *