ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.170

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १७०

योगियां मुनीजनां ध्यानी । ते सुख आसनी शयनीं ॥
हरिसुख फावले रे ॥ गोकुळींच्या गौळिया । गोपी गोधना सकळा ॥
बापरखुमादेविवर विठ्ठले । ते सुख सवंगडीया दिधलें ॥

अर्थ:-

योगी व मुनीजन यांच्या ध्यानातील सुख गोकुळवासियांना घरात पडल्या पडल्या ते सुख मिळाले. ते गोकुळीच्या गवळ्यांनाच नाही तर गोपी, गाई व गोधनासकट सगळ्यांना मिळाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी ते सुख सर्वांना दिले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *