ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.164

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-६ वे, उपासना अभंग १६४

आजी संसार सुफळ जाला गे माये । देखियले पाय विठोबाचे ॥
तो मज व्हावा तो मज व्हावा । वेळों वेळां व्हावा पांडुरंग ॥
बापरखुमादेविवरू न विसंबे सर्वथा । निवृत्तीने तत्त्वतां सांगितले ॥

अर्थ:-
 हे जीवरुप सखे त्या श्री विठ्ठलाचे चरण दिसले व माझा संसार सुफल झाला. तो पांडुरंग मला सतत व वेळोवेळा प्राप्त व्हावा असे वाटते.

त्या माझ्या पित्याला व रखुमाईच्या पतीला कधी विसरु नकोस असे निवृत्तीनाथानी मला निक्षुन सांगितले आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *