ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.८८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ८८

अभाव संगती नाना भूत व्यक्ती । संसार पंगती मेळवी त्यासी ॥ हरिनामे शोक करी अभाव कामारी । याते दूरी करी हरिपाठे ॥

संतांची संगती वेदश्रुतीची मती । घेऊनिया हाती ब्रह्मशास्त्र ॥ ज्ञानदेव म्हणे नारायण नाणे । घेऊनि पारखणे भक्तिपेठे ॥

 अर्थ:-

त्याच्या नामाबद्दल उदासिन असणारा जीव ज्याला श्रध्दा नाही त्याला क्षुद्र योनीत जन्म घ्यावा लागतो. हरिनाम घेत नाही त्याला दुःख प्राप्त होते व ते दुःख त्याच नामाने नाहिसे होते.

संतांची केलेली संगत व श्रुतींचे महावाक्य पाहिले तर हे ब्रह्मनामशस्त्र होऊन जीवाचे रक्षण करते. त्याच नारायण नामाचे नाणे करुन भक्तीच्या पेठेत तपासुन घेत आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *