ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.८७

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ८७

आलिया जवळा भक्तिसुख देखे । पालव पोखे वाणिव भोगी ॥ तें सुख आम्हां विठ्ठल चरणी । निवृत्ति करणी व्यासाचिये ॥

जप तप ज्ञान क्रिया कर्म धर्म । रामकृष्ण नेम गुरु भजने ॥ ज्ञानेदेवो म्हणे संसार निरसी । अखंड मानसी विठ्ठल हरि ॥

अर्थ:-

 भक्तिचा आनंद काय असतो व तो कसा भोगायचा तर संतांच्या जवळच जावे लागते. निवृत्तिनाथ व व्यांस ह्यांच्या कृपेमुळे हे सुख मला विठ्ठल चरणाजवळ सापडते.

जप तप हा ज्ञान व कर्म मार्ग आहे व त्यामुळे रामकृष्णांचे भजन गुरुकृपेने करता येते. सतत विठ्ठलाला मनात स्मरल्यास संसाराचा निरास होतो असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *